Join us

माधुरी दीक्षितच्या दिलखेचक अदा पाहून म्हणाल, 'तबाह हो गये'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 19:29 IST

कलंक या चित्रपटातील 'तबाह हो गये' हे गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे.

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच आपल्या अदांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविते. तिच्या नृत्यातून नेहमीच ती प्रेक्षकांना भुरळ पाडते. पुन्हा एकदा ती रसिकांच्या मनावर आपल्या अदांनी छाप उमटविण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचा आगामी चित्रपट 'कलंक'मधून तिच्या दिलखेचक अदाकारीची झलक पुन्हा एकदा चाहत्यांना पहायला मिळते आहे. या सिनेमातील 'तबाह हो गये' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 

'कलंक' चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. या चित्रपटात माधुरी बहार बेगमच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटातील 'तबाह हो गये' हे गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे.

या गाण्यातील माधुरीच्या अदा व चेहऱ्यावरील हावभाव मोहून टाकत आहेत. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन रेमो डिसुझा व सरोज खान यांनी केली आहे. तर या गाण्याला श्रेया घोषालने स्वरसाज दिला आहे.

'कलंक' या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, साजिद नाडियादवाडा व फॉक्स स्टार स्टुडिओजने केले आहे.

या चित्रपटात वरूण धवन, आलिया भट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :कलंकमाधुरी दिक्षितआलिया भटसंजय दत्तवरूण धवन