Join us

३ दिवस खोलीत सडत राहिली काजोलच्या आजीची डेडबॉडी, ८४व्या वर्षी झाला दुर्देवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 10:13 IST

काजोलची आजी पन्नासच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्या काळात त्यांनी तारुण्यातच स्टारडम अनुभवले होते. पण अभिनेत्रीचा शेवट खूप दुर्देवी झाला होता.

नलिनी जयवंत (Nalini Jaywant) पन्नासच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्या काळात त्यांनी तारुण्यातच स्टारडम अनुभवले होते. पण अभिनेत्रीचा शेवट खूप दुर्देवी झाला होता. त्यावेळी त्यांची काळजी घेणारे कोणीच नव्हतते. नलिनी जयवंत यांचा मृतदेह ३ दिवस खोलीत कुजत राहिला, जो पोलिसांनी दरवाजा तोडून बाहेर काढला होता. फार कमी लोकांना माहिती आहे की नलिनी जयवंत ही काजोल(Actress Kajol)ची दूरची आजी लागते. नलिनी जयवंत यांच्या निधनाची बातमी कळताच काजोल आणि तिची आई तनुजा यांनाही धक्का बसला होता. 

नलिनी जयवंत यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यांच्या वडिलांनी त्यांना डान्सचे धडे गिरवण्यासाठी पाठवले, जिथे त्या नृत्य शिकल्या. नृत्य शिकत असलेल्या नलिनी यांना चित्रपटांमध्ये रस निर्माण झाला आणि नशिबाने लवकरच त्यांच्यासमोर एक मोठी संधी निर्माण केली. त्यांच्या १४ व्या वाढदिवशी, नलिनी यांनी निर्माते चिमनलाल देसाई यांचे लक्ष वेधून घेतले, जे त्यांच्या राधिका चित्रपटासाठी नायिका शोधत होते. मग चिमणलाल देसाई यांनी नलिनीला चित्रपटाची ऑफर दिली, जी त्यांनी स्वीकारली. नलिनी जयवंत यांनी ५० च्या दशकात सौंदर्याच्या बाबतीत मधुबालालाही मागे टाकले होते. नलिनी यांनी ५० च्या दशकात अनेक चित्रपट केले आणि प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले. नलिनी यांना त्यांच्या यशस्वी चित्रपटांमुळे ओळख मिळाली आणि त्यांची गणना मोठ्या नायिकांमध्ये होऊ लागली.

काजोलशी नलिनी जयवंत यांचं आहे हे नातेअभिनेत्री नलिनी जयवंत या काजोलच्या आजी होत्या. काजोलची आजी शोभना समर्थ या अभिनेत्री नलिनी जयदेव यांच्या बहीण होत्या. शोभना यांना पाहिल्यानंतर नलिनी यांना अभिनयाची आवड निर्माण झाली आणि तारुण्यात पाऊल ठेवताच त्यांनी एक यशस्वी अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण केली. नलिनी जयवंत यांनी दोनदा लग्न केले पण त्यांना मूलबाळ झाले नाही. नलिनी यांचे पहिले लग्न चिमनलाल यांचा मुलगा वीरेंद्र देसाई यांच्याशी झाले होते, जे फक्त ३ वर्षे टिकले. यानंतर, त्या पुन्हा अभिनेता प्रभुदयालसोबत स्थिरावल्या, ज्यांनी तिला नेहमीच पाठिंबा दिला. प्रभूदयाळ आणि नलिनी यांना कधीही मुले झाली नाहीत पण ते आनंदी जीवन जगले.

अशोक कुमार यांच्यासोबत होते अफेयरपहिल्या लग्नाच्या घटस्फोटानंतर, नलिनी जयवंत अभिनेते अशोक कुमार यांच्या प्रेमात पडली. अशोक कुमार आणि नलिनी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलली. सुमारे ७ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, त्यांचे ब्रेकअप झाले आणि ते वेगळे झाले. यानंतर, नलिनी यांनी प्रभूदयाल यांच्याशी पुन्हा लग्न केले. नलिनी जयवंत आणि प्रभूदयाल चांगले आयुष्य जगले. ते दोघेही म्हातारपणीही एकत्र राहिले आणि एकमेकांची चांगली काळजी घेतली, परंतु प्रभूदयाळ यांच्या मृत्यूनंतर, नलिनी यांचा सांसारिक गोष्टींमधील रस कमी झाला. त्यांनी स्वतःला जगापासून वेगळे केले आणि एकट्या घरात राहू लागल्या. नलिनी यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले की त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्या क्वचितच घराबाहेर पडायच्या.

२२ डिसेंबर, २०१० रोजी अभिनेत्रीचं झालं निधनअभिनेत्री नलिनी जयवंत यांनी २२ डिसेंबर २०१० रोजी अखेरचा श्वास घेतला. जेव्हा त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांची काळजी घेणारे कोणीही नव्हते. असे म्हटले जाते की नलिनी यांचा मृतदेह घरात सुमारे ३ दिवस कुजत राहिला पण कोणालाही त्याची माहिती मिळाली नाही. पोलिसांनी नलिनी यांच्या घरात घुसून त्यांचा मृतदेह बाहेर काढला आणि नंतर त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. नलिनी जयवंत यांचा मृत्यू अजूनही संशयास्पद मानला जातो. परंतु पोलिसांनी कोणताही गुन्हा नोंदवला नाही. 

टॅग्स :काजोल