Join us
Daily Top 2Weekly Top 5

सासऱ्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला झाले होते अश्रू अनावर, त्यांच्यासोबत होते खास नाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 16:30 IST

काजोलला वीरू देवगण आपली सून नव्हे तर मुलगी मानत असत. त्यामुळेच त्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या निधनाला काल एक वर्षं पूर्ण झाले.

ठळक मुद्देकाजोल ऐश्वर्या रायला मिठी मारून एखाद्या लहान मुलासारखी ओक्सबोक्शी रडली होती. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन दोघेही काजोलला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण तिला समजावणे कोणालाच शक्य नव्हते.

वीरू देवगण यांनी बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर, दिग्दर्शक, निर्माते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे निधन 27 मे 2019 ला झाले. त्यांच्या निधनाला कालच एक वर्षं पूर्ण झाले.वीरू देवगण यांचे त्यांचा मुलगा अजय देवगण आणि सून काजोल यांच्यासोबत खूपच छान नाते होते. त्या दोघांसोबत ते अनेक कार्यक्रमात हजेरी लावत असत.

काजोलला ते आपली सून नव्हे तर मुलगी मानत असत. त्यामुळेच त्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला अश्रू अनावर झाले होते. काजोल ऐश्वर्या रायला मिठी मारून एखाद्या लहान मुलासारखी ओक्सबोक्शी रडली होती. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन दोघेही काजोलला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण तिला समजावणे कोणालाच शक्य नव्हते.

वीरू देवगण यांनी हिंदी सिनेमात आपली ओळख निर्माण करण्यासाठी सुरुवातीच्या काळात बराच संघर्ष केला. अनेक रात्री अन्नावाचून काढल्या. टॅक्सी धुतल्या. आपल्या वडिलांच्या संघर्षाबद्दल एकदा बोलताना अजयने त्यांचा उल्लेख ‘रिअल सिंघम’ असा केला होता. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझे वडील रिअल सिंघम आहेत. कारण ते मुंबईत आले, तेव्हा त्यांच्या खिशात केवळ चार रुपये होते. त्यांनी प्रचंड संघर्ष केला. आठ आठ दिवस उपाशी झोपले. एकदिवस रवी खन्ना यांनी त्यांना पाहिले आणि तू फाईट डायरेक्टर बनशील का, असा प्रश्न त्यांना विचारला. तिथून पुढे भारतातील सर्वात मोठा स्टंट डायरेक्टर बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास शानदार राहिला. मी जन्मलो तोपर्यंत त्यांच्याकडे पैसा, प्रसिद्धी सगळे काही होते. पण त्यांच्या या कामामुळे त्यांच्या डोक्यावर ५० टाके पडले होते. शरीरातील प्रत्येक हाड तुटले होते. त्यामुळेच त्यांच्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरा कुणीच सिंघम असू शकत नाही.

टॅग्स :काजोलअजय देवगण