Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मेणबत्तीपासून आग निर्माण होण्याचा धोका..."; अजय देवगणच्या वाढदिवशी पत्नी काजोल हे काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 18:32 IST

बॉलिवूडचा 'सिंघम' अर्थात अजय देवगण याने नुकताच आपला ५७ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्याची पत्नी आणि अभिनेत्री काजोल हिने मात्र एका हटके आणि मजेशीर पद्धतीने त्याला शुभेच्छा देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

बॉलिवूडचा 'सिंघम' अर्थात अजय देवगण याने नुकताच आपला ५७ वा वाढदिवस साजरा केला. या खास निमित्ताने जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, त्याची पत्नी आणि अभिनेत्री काजोल हिने मात्र एका हटके आणि मजेशीर पद्धतीने त्याला शुभेच्छा देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. काजोलने अप्रत्यक्षपणे अजयच्या वयाचा उल्लेख करत त्याची खिल्ली उडवली आहे. काजोलच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

काजोलची मजेशीर पोस्टकाजोलने २ एप्रिलला इन्स्टाग्राम अकाऊंटवर अजय देवगणचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अजयच्या वयाची काजोलने खास शैलीत खिल्ली उडवली. काजोल लिहिते, ''कधी कधी आपण केकवर जी मेणबत्ती लावतो ती सेलिब्रेशनसारखी कमी भासते. उलट त्या मेणबत्तीपासून आग लागण्याचा धोका आहे, असं वाटत राहतं. मला असं वाटतंय तू सुद्धा त्याच टप्प्यावर पोहोचला आहेस. तरीही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला कायम केक मिळत राहो.''

काजोलची ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली असून त्यावर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, "अजय सर ५७ चे झाले असले तरी पडद्यावर अजूनही विशीतल्या तरुणाला लाजवतील अशी अ‍ॅक्शन करतात." तर दुसऱ्याने म्हटले, "काजोल मॅडम, तुमची जोडी खरंच कमालीची आहे, एकमेकांची प्रेमळ मस्करी करण्याची तुमची पद्धत खूपच गोड आहे."

अजय देवगण सहसा आपले वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरे करण्याऐवजी कुटुंबासोबत शांतपणे घालवणे पसंत करतो. यावर्षीही त्याने आपला वाढदिवस घरच्या घरीच साजरा केल्याची चर्चा आहे. अजय सध्या त्याच्या आगामी 'दृश्यम ३' आणि 'गोलमाल ५' सारख्या मोठ्या चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kajol's witty birthday wish to Ajay Devgn sparks laughter.

Web Summary : Kajol playfully teased Ajay Devgn on his 57th birthday with a humorous Instagram post about cake candles and aging. Fans loved her witty message and the couple's affectionate banter. Ajay celebrated quietly, focusing on upcoming films like 'Drishyam 3'.
टॅग्स :काजोलअजय देवगणबॉलिवूड