Join us
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! हॅलोवीन पार्टी २४ वर्षीय अभिनेत्याच्या आयुष्याची शेवटची रात्र ठरली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 13:11 IST

ली जिहानच्या अचानक एक्झिटने कोरियन फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. ली जिहानच्या मृत्यूनं अनेकांना धक्का बसला आहे.

साऊथ कोरियन फिल्म आणि स्टार्सची क्रेज जगभरात आहे. भारतातही अनेक कोरियन सिनेमाचे चाहते आहेत. कोट्यवधी चाहते असलेल्या साऊथ कोरियन फिल्मी जगतात धक्का देणारी बातमी समोर आली आहे. २४ वर्षीय कोरियन अभिनेता एक्टर ली जिहानचा मृत्यू झाला आहे. हॅलोवीन पार्टीत एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या ली जिहानने या पार्टीत असं काही तरी घडेल ज्यामुळे त्याचा जीव जाईल असा विचारही केला नसेल. 

ली जिहानच्या अचानक एक्झिटने कोरियन फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. ली जिहानच्या मृत्यूनं अनेकांना धक्का बसला आहे. अलीकडे साऊथ कोरियाची राजधानी सिटी सियोल येथील इटावन इथं हॅलोवीन पार्टीचं आयोजन केले होते. त्या पार्टीत झालेल्या गोंधळात जवळपास १५१ लोकांचा मृत्यू झाला तर ८२ पेक्षा अधिक लोक गंभीररित्या जखमी झाले. या दुर्घटनेत साऊथ कोरियन अभिनेता आणि सिंगर ली जिहानचा(Lee Ji Han) मृत्यू झाला आहे. 

ली जिहानच्या टॅलेंट एजन्सीनं सोशल मीडियावर या बातमीला दुजोरा देत पोस्ट लिहिली आहे. त्यात म्हटलंय की, आम्ही या गोष्टीचा अंदाजही लावला नव्हता परंतु ही दु:खद बातमी खरी आहे. आता ली जिहान आपल्यामध्ये नाही. या कठीण काळात जिहानच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना दु:ख सहन करण्याची ताकद देवो. ली जिहानच्या अचानक जाण्याने चाहत्यांवर आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

रिएलिटी शोमधून मिळाली ओळखली जिहाननं त्याच्या करिअरची सुरुवात २०१७ मध्ये एमनेट प्रोड्यूस १०१ सीरीज २ पासून केली होती. या शोमुळे ली जिहान फेममध्ये आला. त्यानंतर २०१९ पासून वेब ड्रामा टुडे अदर नाम ह्यून डे अभिनेता म्हणून पुढे आला. जिहान आयुष्यात आत्ताच यशाची शिखरे गाठत होता परंतु हॅलोवीन पार्टीची रात्र तिच्या आयुष्याची शेवटची रात्र ठरेल असं कुणालाही वाटलं नव्हतं.