महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आणि संगममध्ये श्रद्धेने स्नान करण्यासाठी सेलेब्स देखील गर्दी करत आहेत. एकापाठोपाठ एक चित्रपट आणि टीव्ही स्टार महाकुंभात पोहोचत आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला(Juhi Chawla)ही महाकुंभात पोहोचली असून तिनेही तिथे पवित्र स्नान केले आहे. संगममध्ये स्नान केल्यानंतर अभिनेत्रीने तिचा अनुभव आणि महाकुंभाबद्दल सांगितले.
महाकुंभला पोहोचलेली जुही चावलाने लाइट पिंक रंगाचा एथनिक सूट परिधान केलेला होता. मोकळे केस, डोक्यावर कॅप आणि डोळ्यांवर गॉगल अशा अंदाजात अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत होती. यादरम्यान जुहीच्या गळ्यात फुलांचा हार होता. एएनआयशी बोलताना जुही चावला म्हणाली की, ''आजची सकाळ माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर सकाळ आहे. मी संगमात पवित्र स्नान केले आहे. मला हे ठिकाण सोडायचे नाही. हा खूप खास आणि सुंदर अनुभव होता. मला पोलीस आणि त्या प्रत्येकाचे आभार मानायचे आहेत ज्यांनी येथे इतकी चांगली व्यवस्था केली आहे.'' जुही चावलाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर महाकुंभ शिबिराचा फोटोही शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''आज सकाळी आमचे कॅम्प.''
या कलाकारांनी केलं महाकुंभात स्नानजुही चावलाच्या आधी अनुपम खेर, विवेक ऑबेरॉय, राजकुमार राव, विकी कौशल आणि हेमा मालिनी देखील महाकुंभला गेले होते. याशिवाय रेमो डिसूझा, पूनम पांडे आणि गुरु रंधावा यांनीही महाकुंभला पोहोचून संगमात स्नान केले आहे.