Join us

"मी ड्रग्ज, स्मोकिंग अन् मद्यपान" मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत काय म्हणाला जॉन अब्राहम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:54 IST

'नशामुक्त नवी मुंबई' कार्यक्रमात जॉन अब्राहमचं १ मिनिटाचं भाषण, तुफान टाळ्या

John Abraham  : अभिनेता जॉन अब्राहम याने मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अभिनेता हा त्याच्या फिटनेससाठीही चर्चेत असतो. आपल्या चाहत्यांनाही तो नेहमी हेल्दी आणि फिट राहण्याासाठी प्रोहत्सान देत असतो. यासाठी त्याचं खूप कौतुकही होतं. नुकतंच त्यानं 'नशामुक्त नवी मुंबई' या कार्यक्रमात उपस्थिती लावली. या अभियानाचं उद्घाटन  मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झालं. अंमली पदार्थांच्या विरोधातील या अभियानात संवाद साधताना जीवनात शिस्तबद्ध राहण्याचा सल्ला जॉन अब्राहमने विद्यार्थ्यांना दिला.

'नशामुक्त नवी मुंबई' या अभियानातील भाषणादरम्यान जॉन अब्राहाम म्हणाला की, "मी माझ्या आयुष्यात कधीही  अंमली पदार्थांना स्पर्श केलेला नाही. धूम्रपान करू नका, दारू पिऊ नका आणि ड्रग्ज घेऊ नका. जीवनात खूप शिस्तबद्ध असणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या सहकाऱ्यांसाठी आणि तुमच्या मित्रांसाठी आदर्श बना. माझ्याकडे लांब भाषण देण्यासाठी वेळ नाही, पण मी तुम्हाला फक्त शिस्तबद्ध राहण्याचा सल्ला देईन. या देशाचे आणि भारताचे चांगले नागरिक बना". यासोबत भाषणाच्या शेवटी जॉनने "मी एक मराठी मुलगा आहे आणि याचा मला गर्व आहे", असं म्हणताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. 

जॉन अब्राहमच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा अ‍ॅक्शन थ्रिलर 'वेदा' मध्ये दिसला होता. आता तो 'तेहरान' या २०२५ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या सिनेमामध्ये झळकणार आहे. अभिनेत्याने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जिस्म' चित्रपटाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्याने अनेक हीट चित्रपट दिले. तो अक्षय कुमारसोबत देसी बॉईज, हाऊसफुल २, धूम, बाबुल, नो स्मोकिंग, दनादन गोल, दोस्ताना आणि न्यूयॉर्क सारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. 

टॅग्स :जॉन अब्राहमदेवेंद्र फडणवीसमुंबईनवी मुंबई