Join us

जितेंद्र जोशीच्या लग्नाला १३ वर्षे पूर्ण, म्हणाला - 'कभी तुम कभी मैं...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 11:14 IST

Jitendra Joshi Wedding Anniversary: जितेंद्र जोशी आणि मिताली जोशी यांच्या लग्नाला १३ वर्षे झाली असून त्यानिमित्ताने अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत हटके अंदाजात लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

चित्रपट, छोटा पडदा आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाने अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi)ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दुनियादारीमधील साई असो किंवा मग तुकाराम चित्रपटातील संत तुकारामांची चॅलेजिंग भूमिका, प्रत्येक भूमिकेला जितेंद्र जोशी तितक्याच सहजसुंदर अभिनयाने न्याय देतो. जितेंद्र जोशी आणि मिताली जोशी यांच्या लग्नाला १३ वर्षे झाली असून त्यानिमित्ताने अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत हटके अंदाजात लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जितेंद्र जोशीने पत्नी मिताली सोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, आम्ही लग्न केले कारण आम्ही कवितेतून संवाद साधू शकलो आणि १३ वर्षांच्या वेडेपणा आणि गोंधळानंतरही मला असे वाटू लागले की कवितेवर तसेच एकमेकांवर प्रेम आहे. चला स्वतंत्र होऊ आणि उड्डाण करू. आपल्या जीवनाचे आणि प्रवासाचे सुंदर क्षण अनुभवूयात. आय लव्ह यू मिताली. हॅप्पी अॅनिव्हर्सरी. 

जितेंद्र जोशीने या पोस्टसोबत कविताही लिहिली आहे. त्यात त्याने लिहिले की, कभी तुम कभी मैं, कभी पानी कभी प्यास, कभी देह, कभी मन, कभी दूर, कभी पास. कभी धूप, कभी शाम, कभी चांद, कभी भोर. कभी पेड़,कभी हवा, कभी मौन, कभी शोर. कभी मूढ़, कभी ज्ञ्यानी, कभी जानी, अनजानी. दिल, प्यार, मनमानी और नादानी की कहानी.. कोई पूछे, कभी मांगे, ना सुनानी, ना बतानी, अपनेआप, एक दूजे को, ना जतानी, ना दिखानी – जितेंद्र शकुंतला जोशी

अभिनेता जितेंद्र जोशीच्या पत्नीचे नाव मिताली जोशी असून ती चित्रपट व नाटकांचे लेखन करते आणि तिने नाटकांचे दिग्दर्शनही केले आहे. मिताली आणि जितेंद्र यांना एक मुलगी आहे जिचे नाव रेवा आहे.

टॅग्स :जितेंद्र जोशी