Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध बॉलिवूड सिंगरने गायलं आहे 'झिम्मा २' मधील गाणं, तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 18:59 IST

'झिम्मा २' मधील गाण्याला बॉलिवूड गायिकेने दिलाय आवाज, तुम्ही ओळखलं का?

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी कोटींची कमाई केली आहे. सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, क्षिती जोग अशी कलाकारांची तगडी फौज असलेल्या 'झिम्मा २' साठी प्रेक्षक आतुर होते. 'झिम्मा' नंतर त्याच्या सीक्वलसाठी प्रेक्षक उत्सुक होते. प्रदर्शनाआधीच सगळीकडे झिम्माची क्रेझ पाहायला मिळत होती. यातील गाणीही लोकप्रिय ठरली. 

'झिम्मा २' मधील मराठी पोरी हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतं. या गाण्याबरोबरच सिनेमातील इतर गाण्यांनाही लोकप्रियता मिळत आहे. 'झिम्मा' मधील एका गाण्याला प्रसिद्ध बॉलिवूड गायिकेने आवाज दिला आहे. 'रंग जरासा ओला' हे 'झिम्मा २'मधील हृदयस्पर्शी गाणं आहे. हे गाणं लोकप्रिय बॉलिवूड सिंगर श्रेया घोषाल हिने गायलं आहे. या गाण्याचे बोल प्रेक्षकांच्या हृदयाचा ठेका घेत आहेत. क्षितीज पटवर्धनने हे गाणं लिहिलं असून अमितराज यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. 

दरम्यान, 'झिम्मा २' चे शो हाऊसफुल होत आहे. खासकरुन महिला वर्ग हा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहांत गर्दी करत आहे. 'झिम्मा २'च्या अॅडव्हान्स बुकिंगलाही जोरदार प्रतिसाद मिळाला. या सिनेमाने पहिल्याच दिवशी १.२० कोटींची कमाई केली. त्यामुळे येत्या वीकेंडलाही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, अशी अपेक्षा आहे.  

टॅग्स :श्रेया घोषालमराठी चित्रपटमराठी अभिनेतासेलिब्रिटी