Join us

टिव्हीवरील ही अभिनेत्री एका एपिसोडसाठी घेते तब्बल 85 ते 90 हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 19:07 IST

अभिनेत्री बिपाशा बासूमुळे या अभिनेत्रीचा संसार मोडल्याचे नेहमीच बोलले जाते.

अभिनेत्री जेनिफर विगेंट आपल्या करियरची सुरूवात वयाच्या बाराव्या वर्षी केली होती. तिने राजा को रानी से प्यार हो गया या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर जेनिफर वयाच्या १४व्या वर्षी कुछ ना कहोमध्ये पहायला मिळाली होती. मात्र जेनिफरला खरी ओळख मिळाली ती बेहद या मालिकेतून. बेहदमध्ये तिने साकारलेली मायाची भूमिका खूप गाजली. सध्या जेनिफर विगेंट 'बेहद 2'मध्ये दिसतेय. पिंकवलच्या रिपोर्टनुसार बेहद 2 मध्ये एका एपिसोडसाठी जवळपास 85 ते 90 हजार मानधन आकारते.  

जेनिफर विगेंट तिच्या प्रोफेशनल लाईफ ऐवढीच पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत असते. जेनिफरचा 2012 मध्ये करणसिंग ग्रोवहरसोबत विवाह झाला होता. मात्र काही कारणामुळे त्यांचे बिनसले आणि दोघांनी  2016  काडीमोड घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर करणने बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूसह लग्नकरत आपला वेगळा संसार थाटला. करणसिंगचे बिपाशा बासुसह असलेले लव्ह अफेअरमुळे जेनिफर विगेंटने करणसिंगला घटस्फोट दिला असल्याचे बोलले जाते.त्यामुळे जेनिफर आणि करण यांच्या नात्यात बिपाशा बासुने फुट पाडल्याचे बोलले जाते.

टॅग्स :करण सिंग ग्रोव्हरजेनिफर विगेंट