Join us

स्वतःची मुलगी झाली म्हणून दत्तक घेतलेल्या मुलांना सोडले, जय माहीवर संतापले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 16:11 IST

Jay Bhanushali and Mahhi Vij have a biological daughter named Tara २०१९ मध्ये या कपलच्या आयुष्यात स्वतःच्या बाळाचे आगमन झाले आणि कुठेतरी दत्तक घेतलेल्या मुलांवरुन त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आ

टीव्ही इंडस्ट्रीतील जय भानुशाली आणि माही विज सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. या दोघांनी २०१७ मध्ये दोन मुलांना दत्तक घेतले होते. खुशी आणि राजवीर असे या दत्तक घेतलेल्या मुलांची नावं आहेत.

जय आणि माही दोघांनाही स्वतःचे मुल नव्हते. तोपर्यंत या कपलने मुलांचा चांगला सांभाळ केला. मात्र २०१९ मध्ये या कपलच्या आयुष्यात स्वतःच्या बाळाचे आगमन झाले आणि कुठेतरी दत्तक घेतलेल्या मुलांवरुन त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.

जय माही कुठेही फिरायला जातात तेव्हा फक्त मुलगी तारालाच घेवून जायचे आणि दोन्ही मुलांना घरी सोडून जायचे. एरव्ही राजवीर आणि खुशी बरोबर वेळ घालवणारे कपलने ताराच्या जन्मानंतर दोघांबरोबर वेळ घालवणेही बंद केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले.

 

 

आता तर जय भानुशालीने दोन्ही दत्तक घेतलेल्या मुलांना त्यांच्या आई- बाबांकडे पाठवल्यामुळे चाहतेही भडकले आहेत. या मुलांची जबाबदारी घेतली होती मग पुन्हा त्यांच्या गावी का पाठवले असा सवाल यांना विचारण्यात येतोय. शेवटी यांवर जय भानुशालीने चुप्पी सोडत भली मोठी पोस्टच चाहत्यांसह शेअर केली आहे. 

राजवीर आणि खुशी दोघेही ताराच्या जन्माआधीपासून आमच्या आयुष्याचा भाग राहिले आहेत. आम्हाला ताराच नाही तर खुशी आणि राजवीर असे तीन मुलं आहेत. त्यांना त्यांच्या ख-या आई वडिलांकडेही पाठवणे गरजेचे आहे. मुलांचे आजी आजोबांना मुलांनी त्यांच्या ख-या कुटुंबाकडेच राहावे अशी इच्छा होती. मुलांनाही त्यांच्या कुटुंबापासून दूर ठेवणे आपण कोण आहोत.

 

मुलांना त्यांच्या आई वडिलांकडे राहणे गरजेचे वाटले म्हणून दोघांना परत गावी पाठवल्याचे जय भानुशालीने म्हटले आहे. त्यामुळे उगाच अफवा पसरवू नका. खुशी आणि राजवीर यांना केवळ त्यांच्या आइ-वडिलाचेच नाही तर आम्ही दोघांचे आई-वडिलांसारखेच आहोत. त्यांना दोन घरं आहेत. जेव्हा त्यांना वाटेल ते आम्हाला भेटायला येऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यापासून आम्ही दूर झालेलो नाही.

 

रोज व्हिडीओ कॉल, फोनवरून आम्ही त्यांच्या संपर्कात असतो. त्यामुळे लांब राहिलो म्हणून काय झाले दोघेही ताराप्रमाणेच आमची मुलं आहेत. असेही स्पष्टीकरण नेटक-यांची बोलती बंद केली आहे. 

टॅग्स :जय भानुशाली