Join us
Daily Top 2Weekly Top 5

जावेद जाफरीची मुलगी देते बॉलिवूडच्या सारा, अनन्या व जान्हवीला देते टक्कर, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 20:00 IST

जावेद जाफरीची मुलगी अलाविया ग्लॅमरस फोटोंमुळे येत असते चर्चेत

बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरी याने 'मलाल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यानच्या काळात जावेदच्या मुलाशिवाय मुलगी अलावियादेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं बोललं जात होतं. अलाविया सोशल मीडियावर सक्रीय असून ती खूप सुंदर व ग्लॅमरस आहे. तिचे लूक्स बॉलिवूडमधील सारा, अनन्या व जान्हवीला टक्कर देतात. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलाविया सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे आणि ती तिथे शिक्षण घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अलावियाला फॅशन व बिझनेसमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्यातच शिक्षण घेत आहे.

 अलावियाला बॉलिवूडमधील प्रोजेक्टसाठी ऑफर आल्या आहेत. मात्र सध्या तिने शिक्षणावर लक्ष केंद्रित केल्यामुळे इतक्यात बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याचा तिने विचार केलेला नाही.

एका मुलाखतीत अलावियाचा भाऊ मीजानने सांगितले की, अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी तिला तिचे शिक्षण पूर्ण करायचे आहे. आता तिच्या कोर्सचे तिसरे वर्ष चालू आहे आणि आणखी एक वर्ष बाकी आहे.

मुंबईत लहानाची मोठी झालेली अलावियाने धीरूभाई अंबानी शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे. श्रीदेवीची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर तिची खूप चांगली मैत्रीण आहे.

सोशल मीडियावर अलाविया खूप सक्रीय असून तिने खूप फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो. 

मीजाननंतर आता अलाविया बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे, याची सगळेजण औत्सुकतेनं वाट पाहत आहेत. 

टॅग्स :जावेद जाफरी