Join us
Daily Top 2Weekly Top 5

इतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे? जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण

By रूपाली मुधोळकर | Updated: September 27, 2020 14:27 IST

जावेद अख्तर यांचे एक ट्विट तुफान व्हायरल होतेय. शिवाय त्यांचे एक वक्तव्यही चर्चेत आले आहे.

ठळक मुद्देv

बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरणाने इंडस्ट्री ढवळून निघाली आहे. याप्रकरणी दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांची नावे समोर आल्यानंतर तर इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. अशात बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार व लेखक जावेद अख्तर यांचे एक ट्विट तुफान व्हायरल होतेय. शिवाय एका मुलाखतीतील त्यांचे एक वक्तव्यही चर्चेत आले आहे.

हे कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे?‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत जावेद यांनी एक वक्तव्य केले आणि ते अचानक चर्चेत आले. बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनबद्दल विचारले असता, हे कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटू शकतातच कसे? असा सवाल त्यांनी केला. सध्या बॉलिवूडला ठरवून लक्ष्य केले जातेय की काय असे मला वाटतेय. एका अभिनेत्याच्या मृत्यूवरून सुरू झालेले हे प्रकरण आता एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचले आहे. त्या अभिनेत्याचा मृत्यू राहिला बाजूला, आता वेगळाच वाद सुरु झाला आहे आणि यात बॉलिवूडविरोधी प्रचारच जास्त आहे. मी 1955 पासून बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करतोय. आजचे कलाकार प्रचंड हेल्थ कॉन्शिअस आहेत. असे कलाकार यापूर्वी सिनेसृष्टीत नव्हते.  इतके फिट, तंदुरूस्त कलाकार पाहिल्यानंतर ते ड्रग्ज अ‍ॅडिक्ट आहेत, असे तुम्हाला कसे वाटू शकते? कारण अमली पदार्थाचे सेवन करणारे लोक कधीच इतके फिट राहू शकत नाहीत, असे ते म्हणाले.

करण जोहरच्या त्या पार्टीवरून केले ट्विट

करण जोहरच्या घरी गेल्यावर्षी एक पार्टी झाली होती. या पार्टीत सहभागी झालेल्या कलाकारांनी ड्रग्ज घेतले होते, असा आरोप त्याक्षणी झाला होता. करणने हे आरोप तेव्हाही नाकारले होते. आत्ताही त्याने हे आरोप नाकारले आहेत. या पार्श्वभूमीवर जावेद यांनी मीडियावर निशाणा साधत एक ट्विट केले.‘करण जोहरने त्याच्या पार्टीत काही शेतक-यांना बोलवले असते तर टीव्ही चॅनल्सचे आयुष्य सहज झाले असते. त्यांना शेतक-यांचे आंदोलन आणि करण जोहरची पार्टी यापैकी एक निवडावे लागले नसते. असे वाटतेय की, करणची पार्टी आपल्या चॅनल्सची दुसरी सर्वात आवडती ‘पार्टी’आहे,’ असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले. त्यांचे हे ट्विट सध्या वेगाने व्हायरल होतेय.

घराणेशाही शक्यच नाही...एबीपी माझाच्या मुलाखतीत बॉलिवूडमध्ये घराणेशाही शक्यच नाही, असेही जावेद अख्तर म्हणाले. बॉलिवूडचा कोणताही कलाकार असो, तो प्रेक्षकांच्या जोरावरच मोठा होतो. कितीही मोठ्या स्टारची मुलगा-मुलगी असो, त्यांना फक्त प्रेक्षकच मोठे करू शकतात. आईबाबा या नात्याने आणि कर्तव्य म्हणून स्टार आपल्या मुलांना लॉन्च करत असतीलही. पण प्रतिभा नसेल तर इथे कोणीच टिकणार नाही. त्यामुळे बॉलिवूडमध्ये घराणेशाही शक्यच नाही़,असे ते म्हणाले.

एनसीबी अधिका-यांचे प्रश्न ऐकून दीपिकाला एकदा नाही तिनदा कोसळले रडू!!

In Pics: कधीकाळी या अभिनेत्यावर होत्या फिदा शबाना आझमी, खूप गाजल्या होत्या अफेअरच्या चर्चा

टॅग्स :जावेद अख्तर