Join us
Daily Top 2Weekly Top 5

मदर्स डे निमित्त अशी काढली जान्हवीने आईची आठवण, शेअर केला एक जुना फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 13:07 IST

बॉलिवूड स्टार्सनी सुद्धा हा दिवस सोशल मीडियातून साजरा केला. त्यात जान्हवी कपूरचाही समावेश आहे. जान्हवीने तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आठवण काढली. 

मुंबई : रविवारी झालेल्या मदर्स डे निमित्त प्रत्येकाने वेगवेगळ्या अंदाजात आपल्या आईला सलाम केला. बॉलिवूड स्टार्सनी सुद्धा हा दिवस सोशल मीडियातून साजरा केला. त्यात जान्हवी कपूरचाही समावेश आहे. जान्हवीने तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आठवण काढली. 

जान्हवीने मदर्स डे निमित्ताने इन्स्टाग्रामवर श्रीदेवी यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला. या फोटोला जान्हवीने काहीही कॅप्शन दिलं नाही. पण तिच्या भावना तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचल्या. या फोटोला चांगलंच पसंत केलं जात आहे.

श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनिल कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूरचे लग्न झालं. या लग्नात जान्हवी आणि तिची बहीण चांगल्याच आनंदी दिसल्या. महत्वाची बाब म्हणजे बोनी कपूर, अर्जून कपूर, त्याची बहीण अंशुला कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर हे चौघे एकत्र दिसले. यांचा एकत्र फोटोही चांहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

टॅग्स :जान्हवी कपूरश्रीदेवी