Join us

जान्हवी कपूरच्या ब्रेसलेटची किंमत जाणून तुम्ही व्हाल थक्क,तर कारण वाचून तुम्हालाही वाटेल तिचा अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 21:00 IST

स्टारकिड्सच्याही लाइफस्टाइलवर चर्चा होताना दिसते आहे. त्यात शाहरूखची मुलगी सुहाना खान आघाडीवर आहे.त्यापाठोपाठ आता श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरही या यादीत गणली जात आहे.

सेलिब्रेटींचे लाइफस्टाइल खरच वेगळे असते. त्यांच्या खान-पानापासून कपडे परिधान करण्यापर्यंत सा-याच  गोष्टी अनोख्या असतात. मात्र आता सेलिब्रेटींपेक्षाही स्टारकिडसचाच थाट मोठा असल्याचे गेल्या काही दिवसांत पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत फक्त शाहरूख,सलमान,दीपिका, प्रियंका अशा ए- लिस्टर सेलिब्रेटींच्या महागड्या वस्तुंची चर्चा व्हायची. मात्र आता स्टारकिड्सच्याही लाइफस्टाइलवर चर्चा होताना दिसते आहे. त्यात शाहरूखची मुलगी सुहाना खान आघाडीवर आहे.त्यापाठोपाठ आता श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरही या यादीत गणली जात आहे. नुकताच जान्हवीने तिच्या हातात एक छानसे ब्रेसलेट घातलेला फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. दिसायला हा ब्रेसलेट अगदी साधा वाटत असला तरी या ब्रेसलेटची किंमत जाणून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. या ब्रेसलेटची किंमत 500 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 35,435 रुपये इतकी आहे. हे ब्रेसलेट तिने खरेदी केल्याचे कारणही स्पष्ट केले असून इतरांनीही हे ब्रेसलेट खरेदी करण्याचे आवाहन केेले आहे. एका सामाजिक संस्थेला मदत व्हावी म्हणून तिने हे ब्रेसलेट खरेदी केल्याचे सांगितले आहे. हे प्रोडक्ट तुम्ही खरेदी केले तर त्या रकमेतून काही भाग हा त्या संस्थेला देण्यात येणार असल्याची माहितीही जान्हवी द्यायला विसरली नाही. या उपक्रमासाठी शक्य झाल्यास इतरांनाही अशा प्रकारे मदत करण्याचं आवाहन तिने केले आहे. तसेच जान्हवीची दिलदारी पाहून युजर्सही तिचे कौतुक करताना दिसत आहेत.काही युजर्सनी तर जान्हवीचे मन आहे आभाळा एवढं मोठं...असेही म्हटले आहे. 

जान्हवी कपूरने 'धडक' या सिनेमातून  बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री केली. 'सैराट' या सुपरडुपर मराठी सिनेमाचा रिमेक असलेल्या 'धडक' सिनेमात जान्हवीची प्रमुख भूमिका होती.श्रीदेवी यांची लेक असल्याने जान्हवीकडून साऱ्यांनाच खूप अपेक्षा आहेत. त्यामुळेच श्रीदेवी यांच्या गाजलेल्या अनेक सिनेमांपैकी कोणत्या सिनेमाच्या रिमेकमध्ये काम करायला आवडेल असा प्रश्न जान्हवीला एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता श्रीदेवी यांच्या गाजलेल्या 'सदमै' सिनेमाचा रिमेक व्हावा आणि त्यात श्रीदेवी यांनी साकारलेली भूमिका साकारायला आवडेल अशी प्रतिक्रिया जान्हवीने दिली आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूर