Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी दिसली एक्स बॉयफ्रेंडसोबत, हॉलिडे एन्जॉय करतानाचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 13:01 IST

जान्हवी कपूरच्या एक्स बॉयफ्रेंडचे नाव अक्षत रंजन असून तिला नुकतेच त्याच्यासोबत हॉलिडे एन्जॉय करताना पाहाण्यात आले.

ठळक मुद्देलोणावळ्यामधील हे फोटो असून सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक-निर्माते बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. जान्हवी सोशल मीडियावर देखील सक्रिय असून तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिला सोशल मीडियावर तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. जान्हवीला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घ्यायची तिच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. आज तिच्या खाजगी आयुष्याविषयी एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

जान्हवी कपूरच्या एक्स बॉयफ्रेंडचे नाव अक्षत रंजन असून तिला नुकतेच त्याच्यासोबत हॉलिडे एन्जॉय करताना पाहाण्यात आले. लोणावळ्यामधील हे फोटो असून सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

अक्षय आणि जान्हवीची ओळख खूपच जुनी आहे. त्या दोघांनी बॉस्टनच्या टफ्टस युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले असून त्या दोघांची तेव्हापासूनची घट्ट मैत्री आहे. त्याला जान्हवीच्या अनेक फॅमिली फंक्शनमध्ये देखील पाहायला मिळते. ते दोघे अनेक महिने नात्यात होते. पण दरम्यानच्या काळात त्यांच्यात ब्रेकअप झाले असल्याचे म्हटले जात होते. पण आता त्यांच्यात पॅचअप झाले आहे का असा प्रश्न त्यांचे फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. 

जान्हवीच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सांगायचं तर जान्हवी सध्या आयएएफ पायलट गुंजन सक्सेनाच्या बायोपिकचं शूटिंग करत आहे. या चित्रपटाचं नाव कारगिल गर्ल असे आहे. 

याशिवाय ती रुहीअफ्जा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे. तसेच ती तख्तमध्येदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :जान्हवी कपूर