Join us
Daily Top 2Weekly Top 5

कधी लग्न करणार जान्हवी कपूर? सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी म्हणाली, "लग्नाचं प्लॅनिंग..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 18:04 IST

जान्हवी कपूर बिझनेसमन शिखर पहाडियाला डेट करत आहे हे तर आता जगजाहीरच आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या बॉलिवूड आणि साउथ दोन्ही इंडस्ट्रीत सक्रीय आहे. एकानंतर एक तिचे सिनेमे रिलीज होत आहेत. या सगळ्यांमध्ये जान्हवीचं सौंदर्य दिवसेंदिवस आणखी खुलत आहे. नुकताच तिचा 'परम सुंदरी' सिनेमा रिलीज झाला. यात तिची आणि सिद्धार्थ मल्होत्राची केमिस्ट्री चाहत्यांना आवडली. तर आता ती पहिल्यांदाच वरुण धवनसोबत दिसणार आहे. त्यांचा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' सिनेमा येत्या काही दिवसात रिलीज होत आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर लाँच पार पडला. यावेळी जान्हवीने खऱ्या आयुष्यात लग्नाचा प्लॅन कधी आहे यावर उत्तर दिलं.

शशांक खेतान दिग्दर्शित 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. वरुण धवन या सिनेमातून पुन्हा आधीच्याच कॉमेडी अंदाजात परतत आहे. तर त्याच्यासोबत जान्हवी कपूर आहे. सिनेमात सान्या मल्होत्रा आणि रोहित सराफही आहेत. आजच मुंबईत सिनेमाचा ट्रेलर लाँच इव्हेंट झाला. यावेळी जान्हवीने पिंक शेड लेहंगा परिधान केला होता. यावर मोत्यांच्या डिझाईनचा ब्लाऊज आणि नेट ची ओढणी होती. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. ट्रेलरनंतर माध्यमांशी बोलताना एका पत्रकाराने जान्हवीला विचारलं की, 'लग्नाचा माहोल बनला आहे तर तुझा लग्नाविषयीचा प्लॅन काय आहे?' यावर जान्हवी म्हणाली, "माझा सध्या तरी लग्नाचा प्लॅन नाही. मी विचार केलेला नाही कारण सध्या माझं प्लॅनिंग फक्त सिनेमांबाबतीतच आहे.'

जान्हवी कपूर बिझनेसमन शिखर पहाडियाला डेट करत आहे हे तर आता जगजाहीरच आहे. शिखर हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. दिसायला डॅशिंग, हँडसम असा शिखर अनेक वर्षांपासून जान्हवीच्या प्रेमात आहे. मधल्या काळात दोघांचं ब्रेकअपही झालं होतं. मात्र शिखर तिची कायम वाट पाहत राहिला. जान्हवीच्या आईच्या निधनानंतर शिखरने तिला आणि कुटुंबाला खूप आधार दिला. यानंतर जान्हवी पुन्हा शिखरच्या प्रेमात पडली. आता दोघं लग्न कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

टॅग्स :जान्हवी कपूरबॉलिवूडलग्न