Join us
Daily Top 2Weekly Top 5

पापा बोनी कपूर झालेत स्लिम ट्रिम अ‍ॅण्ड हेल्दी; जान्हवी लई खुश्श!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 14:39 IST

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:बद्दलची माहिती, रोज नवे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण आता आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने शेअर केलेली स्टोरी तिच्याबद्दल नाही तर तिचे पापा बोनी कपूर यांच्याबद्दल आहे.

ठळक मुद्देश्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर खुशी आणि जान्हवी या दोघींना अगदी आईच्या मायेने जपत आहेत. तूर्तास त्यांनी ‘मिस्टर इंडिया’च्या सीक्वलची तयारी सुरु केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:बद्दलची माहिती, रोज नवे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण आता आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने शेअर केलेली स्टोरी तिच्याबद्दल नाही तर तिचे पापा बोनी कपूर यांच्याबद्दल आहे.होय, जान्हवीने पापा बोनी कपूर यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत बोनी कपूर आधीपेक्षा बरेच फिट दिसत आहेत. याचे कारण म्हणजे, बोनी कपूर यांनी घटवलेले वजन. होय, खुद्द जान्हवीने याची माहिती दिली. ‘पापांनी १२ किलो वजन घटवले. स्लिम ट्रिम आणि हेल्दी. मला तुमचा अभिमान वाटतो,’ असे तिने लिहिले आहे.

 

जान्हवी फिटनेसला किती महत्त्व देते, ते आपण जाणतोच. रोज जिमला जातानाचे फोटो ती शेअर करत असते. कदाचित जान्हवी व खुशीच्या आग्रहाखातर म्हणा किंवा त्यांच्यापासून प्रेरीत होऊन म्हणा बोनी कपूर यांनीही आताश: फिट राहण्याचा निर्धार केलेला दिसतोय.

जान्हवी वडिलांच्या अतिशय जवळ आहे. अलीकडे कॉफी विद करण शोमध्ये  जान्हवी आपल्या पापाबद्दल भरभरून बोलली होती. पापा आम्हा भावंडांवर खूप प्रेम करतात. आम्हाला अगदी फुलासारखे जपतात. आम्हा सर्वांमध्ये खुशी त्यांची सर्वाधिक लाडकी आहे, असे तिने सांगितले होते.

श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर खुशी आणि जान्हवी या दोघींना अगदी आईच्या मायेने जपत आहेत. तूर्तास त्यांनी ‘मिस्टर इंडिया’च्या सीक्वलची तयारी सुरु केली आहे. मिड डेशी बोलताना बोनी कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’चा सीक्वल येणार, यावर शिक्कामोर्तब केले होते आधी या चित्रपटाचा रीबूट बनवण्याची योजना आहे. नंतर याच्या फ्रेंचाइजीवर काम केले जाईल. आमच्याकडे या सीक्वलचा बेसिक स्ट्रक्चर तयार आहे. पण यावर काम कधी सुरु होणार, हे अद्याप ठरलेले नाही. पण हे काम लवकरच सुरु होईल, एवढेच मी सांगेल, असे  त्यांनी , असे त्यांनी सांगितले होते.

टॅग्स :जान्हवी कपूरबोनी कपूर