Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवींनी लिहिलेली ती नोट वाचून भावूक झाली जान्हवी कपूर; म्हणाली, मिस यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 12:58 IST

बॉलिवूड सुपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाला आज 3 वर्ष पूर्ण झालीत.

ठळक मुद्देदुबईच्या एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. त्या दुबईमध्ये मोहित मारवाहच्या लग्नासाठी गेल्या होत्या.

आजच्याच दिवशी बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला होता. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवींच्या निधनाची बातमी आली आणि सगळ्यांनाच शोकसागरात लोटून गेली. आजही श्रीदेवींच्या आठवणीने चाहते भावूक होतात. कुटुंबाचे म्हणाल तर अद्यापही बोनी कपूर, जान्हवी, खूशी या धक्क्यातून सावरलेले नाहीत. आज श्रीदेवींच्या स्मृतीदिनी जान्हवी कपूरने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.श्रीदेवींनी आपल्या हातांनी लिहिलेली नोट जान्हवीने शेअर केली आहे. या नोटमध्ये श्रीदेवींनी लेकीवर प्रेमाचा वर्षाव केला होता.

ही नोट शेअर करत, जान्हवी आईला मिस करत असल्याचे लिहिले आहे. ‘आय लव्ह यू माझ्या लब्बू... तू या जगातील सर्वात चांगली मुलगी आहेस,’ असे श्रीदेवींनी या नोटमध्ये लिहिले होते.श्रीदेवींच्या तिस-या पुण्यतिथीनिमित्त आज जान्हवी कपूर, खुशी कपूर व बोनी कपूर यांच्या चेन्नईतील घरी पूजेचे आायोजन करण्यात आले आहे.

खुशी कपूरही झाली भावूक ...

आईच्या आठवणीने श्रीदेवींची लहान लेक खुशी कपूरही भावूक झाली. श्रीदेवी व बोनी कपूर यांचा एक जुना फोटो शेअर करत आय लव्ह यू...., असे लिहित तिने पोस्ट शेअर केली आहे.

अखेरचा व्हिडीओ झाला व्हायरल...

दुबईच्या एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. त्या दुबईमध्ये मोहित मारवाहच्या लग्नासाठी गेल्या होत्या. लग्नातील श्रीदेवींच्या मृत्यूपूर्वी काही तास आधीचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  यात श्रीदेवी, खुशी कपूर आणि बोनी कपूर यांच्यासोबत दिसत आहेत.  

टॅग्स :श्रीदेवीजान्हवी कपूर