जान्हवी कपूर सध्या काय करतेय? तर ‘रूहअफ्जा’ या चित्रपटात बिझी आहे. पण तूर्तास जान्हवी आपल्या या आगामी चित्रपटाबद्दल काहीही बोलायला तयार नाही. खरे तर नवा चित्रपट येणार म्हटल्यावर स्टार्स भरभरून बोलतात. नको इतके प्रमोशन करतात. पण जान्हवी ‘रूहअफ्जा’बद्दल तोंड उघडायला तयार नाही. याचे कारण म्हणजे, तिला वाटत असलेली भीती. होय, फार बोलले तर माझ्या चित्रपटाला त्याला दृष्ट लागेल, असे तिचे म्हणणे आहे.
जान्हवी कपूरला वाटतेय ‘या’ गोष्टीची भीती; याला अंधश्रद्धा म्हणाल की आणखी काही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 13:04 IST
नवा चित्रपट येणार म्हटल्यावर स्टार्स भरभरून बोलतात. नको इतके प्रमोशन करतात. पण जान्हवी तोंड उघडायला तयार नाही. याचे कारण म्हणजे, तिला वाटत असलेली भीती.
जान्हवी कपूरला वाटतेय ‘या’ गोष्टीची भीती; याला अंधश्रद्धा म्हणाल की आणखी काही?
ठळक मुद्दे२० मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणा-या या चित्रपटात जान्हवी डबल रोलमध्ये दिसणार, असे कळतेय. रूही आणि अफसाना अशा दोन भूमिका ती वठवणार आहे.