Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूरचा हा डान्स पाहून युजर्सनी घेतली मजा! शहामृगाशी केली तुलना!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 14:05 IST

‘धडक’ गर्ल जान्हवीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. पण या व्हिडीओमुळे जान्हवीला ट्रोल केले जातेय.

ठळक मुद्देजान्हवीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे तर लवकरच ती ‘रूहअफ्जा’ या चित्रपटात दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर मॉम श्रीदेवसारखीच उत्तम डान्सर आहे, यात कुठलेही दुमत नाही. ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करण्यापूर्वी जान्हवी  कथ्थक शिकली. कथ्थक करतानाचा तिचा एक व्हिडीओ गत वर्षी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओने चांगलीच धूम केली होती. तूर्तास ‘धडक’ गर्ल जान्हवीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. पण या व्हिडीओमुळे जान्हवीला ट्रोल केले जातेय.  या व्हिडीओत जान्हवी बेली डान्स करताना दिसतेय. खरे तर जान्हवीचा हा डान्स व्हिडीओ एका चॅलेंजचा भाग होता. ‘धडक’चे दिग्दर्शक शशांक खेतान यांनी दिलेल्या ‘डान्स दिवाने चॅलेंज’अंतर्गत जान्हवीने हा व्हिडीओ बनवला होता. पण यातील जान्हवीचा अंदाज काही युजर्सला भावला नाही आणि त्यांनी तिला  वाईट पद्धतीने ट्रोल करणे सुरु केले.

‘आधी फिगर बनव आणि मग बेली डान्स कर,’ असे एका युजरने तिला सुनावले. एका युजरने तर तिची तुलना थेट शहामृगाशी केली. ‘हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एखादे शहामृग नाचतेय, असे वाटतेय. हे प्रचंड भयावह आहे,’ असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरने हा कुठूनही बेली डान्स वाटत नाही, अशा शब्दांत जान्हवीला ट्रोल केले.

अर्थात काही चाहते जान्हवीच्या बाजूनेही उभे ठाकले. काही लोक प्रचंड नकारात्मक असतात. त्यांना काहीच चांगले दिसत नाही. त्यामुळे तू दुर्लक्ष करत आणि तुला वाटते तेच कर, अशा शब्दांत या चाहत्यांनी जान्हवीला पाठींबा दिला. एकंदर काय तर शशांक खेतानचे चॅलेंज स्वीकारून जान्हवी नाहक ट्रोलिंगची बळी ठरली.

जान्हवीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे तर लवकरच ती ‘रूहअफ्जा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती राजकुमार रावसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. याशिवाय करण जोहरच्या ‘तख्त’ या मल्टिस्टारर चित्रपटातही ती झळकणार आहे. गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्येही तिची वर्णी लागली आहे.

टॅग्स :जान्हवी कपूर