Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुझ्या बेबीकडून...", जान्हवीच्या वाढदिवशी बॉयफ्रेंड शिखर पहाडियाची पोस्ट, माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करतेय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 15:38 IST

जान्हवीच्या २७व्या वाढदिवसानिमित्त शिखरने जान्हवीवरील प्रेमाची कबुली दिली आहे. गर्लफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त त्याने खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनय आणि सौंदर्याने घायाळ करणाऱ्या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या जान्हवी कपूरचा आज वाढदिवस आहे. २०१८ साली धडक सिनेमातून पदार्पण करत जान्हवीने आईच्या पावलावर पाऊल ठेवलं. जान्हवी ही सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक आहे. 'धडक' नंतर जान्हवी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये दिसली. 'गुंजन सक्सेना', 'गुडलक जेरी', 'बवाल' या सिनेमातील तिच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही झालं. अभिनयाबरोबरच जान्हवी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. 

जान्हवी सध्या शिखर पहाडियाला डेट करत आहे. आज जान्हवीच्या २७व्या वाढदिवसानिमित्त शिखरने जान्हवीवरील प्रेमाची कबुली दिली आहे. गर्लफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त त्याने खास पोस्ट शेअर केली आहे. शिखरने त्याच्या इन्स्टाग्रामवर जान्हवीबरोबरचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे. "हॅपी बर्थडे" म्हणत त्याने हार्ट इमोजी शेअर केले आहेत. दुसऱ्या स्टोरीमध्ये त्याने जान्हवीचा श्वानाबरोबरचा फोटो शेअर करत " तुझ्या सर्व बेबीकडून प्रेम" असं म्हटलं आहे. 

शिखर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहाडिया यांचा तो मुलगा आहे. जान्हवी आणि शिखरला अनेकदा एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. दरम्यान, जान्हवी 'बडे मियां छोटे मियां' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूरसेलिब्रिटीसुशीलकुमार शिंदे