Join us

कपूर खानदानातील या अभिनेत्रीवर का वेळ आली ड्रायव्हरकडून पैसे उधार घेण्याची?, पहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 20:00 IST

कपूर खानदानातील या अभिनेत्रीच्या या व्हिडिओला खूप पसंती मिळते आहे. 

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीबोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर हिने धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. जान्हवी सोशल मीडियावर देखील सक्रीय असून तिचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून दिसत आहे की ती पैसे न घेता घराबाहेर पडली आहे आणि तिला तिच्या ड्रायव्हरकडून पैसे उधार घ्यावे लागले. जान्हवीच्या या व्हिडिओला खूप पसंती मिळते आहे. 

जान्हवीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत ती रस्त्यावर तिच्या कारजवळ जाताना दिसते आहे. त्यावेळी तिच्या मागून एक छोटा मुलगा धावत आला आणि तिच्याकडे पुस्तक विकत घेण्यासाठी विनंती करू लागला. मात्र जान्हवीनं हसत त्याला तिच्याकडे पैसे नाही सांगितलं आणि कारमध्ये जाऊन बसली. त्यानंतर जान्हवीने ड्रायव्हरकडून पैसे घेऊन त्या मुलाला दिले आणि हसत त्याला बाय केलं. त्या मुलाने खुश होऊन तिला बाय दीदी केलं. जान्हवीचा हा व्हिडिओ पाहून सगळे तिचे खूप कौतूक करत आहेत.   

जान्हवीच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सांगायचं तर जान्हवी सध्या आयएएफ पायलट गुंजन सक्सेनाच्या बायोपिकचं शूटिंग करत आहे. या चित्रपटाचं नाव कारगिल गर्ल सांगितलं जातंय.

याशिवाय ती रुहीअफ्जा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव दिसणार आहेत.

तसेच ती तख्तमध्येदेखील दिसणार आहे. 

 

टॅग्स :जान्हवी कपूरश्रीदेवीबोनी कपूरधडक चित्रपटतख्त