Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता'मधील अय्यर वयाच्या ४२व्या वर्षी बांधणार लग्नगाठ, भावी पत्नी आहे खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 11:37 IST

Tanuj Mahashabde : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये 'अय्यर'ची भूमिका साकारणारा तनुज महाशब्दे खऱ्या आयुष्यात कोणालातरी डेट करत आहे आणि लवकरच लग्न करणार आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा कॉमेडी शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील सर्व पात्र प्रेक्षकांना हसवण्यात कधीच कमी पडत नाहीत. विशेषत: मालिकेमधील 'अय्यर' आणि 'बबिता जी' या जोडीने लोकांना खूप हसवले आहे. या दोघांच्या जोडीला 'जेठालाल'ची मजाही लोकांना आवडते. 'बबिता जी' म्हणजेच मुनमुन दत्ताच्या सौंदर्यावर लोकांना खात्री आहे. चंद्राचा तुकडा 'अय्यर'च्या हाताला लागला असल्याचं म्हटलं जातं. केवळ रील लाइफमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही 'अय्यर' त्याच्या पत्नीच्या बाबतीत नशीबवान आहे, कारण त्याची भावी पत्नी सौंदर्याच्या बाबतीत 'बबिता जी'लाही मागे टाकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये 'अय्यर'ची भूमिका करणारा तनुज महाशब्दे (Tanuj Mahashabde) खऱ्या आयुष्यात कोणालातरी डेट करत आहे आणि लवकरच लग्न करणार आहे. या बातमीनंतर त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत आणि खऱ्या आयुष्यात त्याची भावी पत्नी कोण आहे हे जाणून घ्यायचे आहे.

तनुज महाशब्देच्या भावी पत्नीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही, परंतु बातमी अशी आहे की त्याची फियॉन्से खूप सुंदर आहे. तनुजची फियॉन्से सुंदरतेच्या बाबतीत 'बबिता जी'पेक्षा दोन पावले पुढे आहे. सध्या तनुज महाशब्देने त्याच्या भावी पत्नीचा फोटो किंवा तिचे नाव चाहत्यांसोबत शेअर केलेले नाही. ते लवकरच रहस्य उलगडतील आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतील अशी आशा चाहत्यांना आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा