१३ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेल्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील प्रत्येक भूमिका लोकांच्या मनात घर करून आहे. पण मालिकेतील बबीताजी म्हणजे अभिनेत्री मुनमुन दत्ताची (Munmun Dutta) बातच वेगळी आहे. ती सतत फॅन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी सोशल मीडियावर अॅक्टिव राहते. अशात ती बिग बॉसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली असताना तिचा एका जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कोणत्या मालिकेतील नाही तर एका सिनेमातील आयटम नंबरचा आहे.
या व्हिडीओत मुनमुन दत्ता नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहे. पण नेहमीच डिसेंट लूकमधील दिसणारी मुनमुन यात शॉर्ट्स घालून ठुमके लगावताना दिसत आहे. हा व्हिडीओ बराच जुना असल्याने ती यात अधिक तरूणही दिसत आहे.
या व्हिडीओत मुनमुन दत्ता कधी बेली डान्स तर कधी पोल डान्स करताना दिसत आहे. जे पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. साऊथमधील एका सिनेमातील तिने आयटम नंबर केला होता त्याचा हा व्हिडीओ आहे.
दरम्यान तारक मेहता....मधून लोकप्रिय होण्याआधी अभिनेत्री मुनमुन दत्ताने २००४ साली झी टीव्हीवरील 'हम सब बाराती' मालिकेतून डेब्यू केलं होतं. सोबतच तिने कमल हसनसोबत मुंबई एक्सप्रेस, २००६ साली हॉलिडे सारख्या सिनेमात काम केलं होतं.
या वीकेंडला मुनमुन दत्ता बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. ती वाइल्ड कार्ड एन्ट्री द्वारे घरात येणार असल्याचं बोललं जात आहे. पण तिने याबाबत काहीच अधिकृत सांगितलं नाही.