Join us

'मराठी कलाकारांनी अशा पद्धतीनं बोलणं लज्जास्पद', केतकी चितळेवर संतापली मानसी नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 13:04 IST

Ketaki Chitale: केतकी चितळेने शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे जवळ जवळ सर्व महाराष्ट्रच पेटून उठला आहे. अनेक राजकीय मंडळींनी केतकीच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दरम्यान अभिनेत्री मानसी नाईक(Manasi Naik)नेही नाराजी व्यक्त केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale)ने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राजकारण ढवळून निघाले आहे. केतकीच्या पोस्टचा अनेक राजकीय नेते आणि कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. आता या प्रकरणावर अभिनेत्री मानसी नाईक(Manasi Naik)ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

केतकी चितळेनेशरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे जवळ जवळ सर्व महाराष्ट्रच पेटून उठला आहे. अनेक राजकीय मंडळींनी केतकीच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दरम्यान अभिनेत्री मानसी नाईकनेही नाराजी व्यक्त केली आहे. तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, 'मी जेव्हा हे वाचले तेव्हा खूप वाईट वाटले. मराठी कलाकारांनी अशा पद्धतीने बोलणे लज्जास्पद आहे. फक्त केतकीच नाही तर वडिलधाऱ्या माणसाबद्दल बोलताना कोणीही दोनदा विचार करायलाच हवा. शरद पवार हे फक्त महाराष्ट्रातले किंवा देशातील मोठे नाव नाही, तर जागतिक पातळीवर हे एक नाव आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना कोणीही पातळी सोडता कामा नये.  ती पुढे म्हणाली की, केतकी चितळेने जे केले ते चुकीचेच आहे. या प्रकरणात तिला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून लोकांना समजेल की कोणाबद्दल आपण असे बोलू शकत नाही.

या प्रकरणावर ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनीदेखील तीव्र प्रतिक्रिया दिली होती. ‘जे बोललीस ते शब्द मागे घेतले नाहीस आणि पवार साहेबांची माफी मागितली नाही तर तू जिथे कुठे असशीन तिथून तुला शोधून काढून पवार साहेबांच्या पायापर्यंत आणलं नाही तर नावाची सविता मालपेकर नाही,’ अशा शब्दांत त्यांनी केतकीला झापले होते.
टॅग्स :मानसी नाईककेतकी चितळेशरद पवार