Join us
Daily Top 2Weekly Top 5

रितेश देशमुखच्या करिअरमध्ये पहिल्यांदा घडले असे काही, वाचून तुम्हाला बसले धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 08:00 IST

सध्या अभिनेता रितेश देशमुख आपली आगामी फिल्म माऊलीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. माऊली सिनेमाच्या प्रमोशनमुळे महाराष्ट्र दौरा केलेल्या रितेशच्या लोकप्रियतेतही चांगलीच वाढ झालेली आहे.

ठळक मुद्देरितेश 19व्या स्थानावरून 9 स्थानी पोहोचला आहे

सध्या अभिनेता रितेश देशमुख आपली आगामी फिल्म माऊलीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. माऊली सिनेमाच्या प्रमोशनमुळे महाराष्ट्र दौरा केलेल्या रितेशच्या लोकप्रियतेतही चांगलीच वाढ झालेली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत रितेश देशमुख पुढे गेलेला आहे.

 माऊलीच्या प्रमोशनच्या सुरूवातीला स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर रितेश 19व्या स्थानावरून 9 स्थानी पोहोचला आहे. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. 

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, "रितेशच्या वाढत्या लोकप्रियतेवरून दिसून येतं, की, देशभरात मराठी सिनेमा पाहणा-या दर्शकांमध्ये रितेश देशमुखचा मोठा चाहतावर्ग आहे. माऊली चित्रपटाच्या प्रमोशनमुळे सोशल, व्हा यरल आणि डिजिटल प्लेटफार्मवर रितेशच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ दिसून आलीय."

अश्वनी कौल सांगतात, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या माध्यमातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकतो.” 

टॅग्स :रितेश देशमुखमाऊली