Join us
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीकडून पुरस्कार मिळणे हा बहुमानच - करीना कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 20:30 IST

‘लक्स गोल्डन रोझ कॉन्फिडन्ट ब्युटी ऑफ द इयर’ या पुरस्काराने करीना कपूरला सन्मानित करण्यात आले.

स्टार प्लस’चा लक्स गोल्डन रोझ पुरस्कार सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. यंदा या पुरस्काराचे तिसरे वर्ष होते. या कार्यक्रमास बॉलिवूडमधील सर्व नामवंत सिनेतारका उपस्थित होत्या. या पुरस्कारांमध्ये अग्रगण्य तारका करीना कपूर हिला अनेक पुरस्कार मिळालेच, पण विशेष म्हणजे तिची बहीण करिष्मा कपूर हिच्या हस्ते तिला एक पुरस्कार प्रदान करण्यातआला.‘लक्स गोल्डन रोझ कॉन्फिडन्ट ब्युटी ऑफ द इयर’ या पुरस्काराने करीना कपूरला सन्मानित करण्यात आले. तिने हा पुरस्कार आपल्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातील सहनायिका सोनम कपूर आहुजा, स्वरभास्करा आणि शिखा तलसानिया यांच्याबरोबर वाटून घेतला. या पुरस्काराबाबत करीना म्हणाली, “माझ्या आवडत्या नायिकांबरोबर मला पुरस्कार प्रदान करण्यात आला ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे. पण माझ्या बहिणीच्या हस्ते मला हा पुरस्कार देण्यात आला, ही माझ्या दृष्टीने विशेष बाब आहे. कारण माझी बहीण हीच माझा आदर्श आणि प्रेरणास्थान राहिली आहे. तिच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारणे हा मी माझा बहुमानच समजते.”‘स्टार प्लस’चा ‘लक्स गोल्डन रोझ पुरस्कार’ प्रदान समारंभ हा प्रेक्षकांसाठी एक नक्कीच आनंदसोहळा ठरेल. ‘लक्स गोल्डन रोझ’ पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच फक्त ‘स्टार प्लस’वर पाहता येणार आहे.

टॅग्स :करिना कपूरस्टार प्लस