Join us

'...त्यासाठी पुरूषाच्या पावतीची गरज नाही'; दुसऱ्या लग्नाबद्दल तेजस्विनी पंडित स्पष्टच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 15:26 IST

Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितले.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील सुंदर आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आपल्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. तेजस्विनी प्रोफेशनल लाइफशिवाय खासगी आयुष्याबाबत बिनधास्त मत मांडत असते. दरम्यान आता तेजस्विनीने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितले.

तेजस्विनी पंडितने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ''आता मी सेटल आहे. माझ्या आयुष्यात मी पूर्णपणे सक्षमरित्या उभी आहे. मला कुणाशी लग्न करणे किंवा आयुष्यात पुरूष असणे हे माझ्या सेटल होण्याचे कारण नाही किंवा उदाहरणही नाही. मी खूश आहे. मी मजेत आहे. मी काम करतेय आणि मी माझ्या परिवाराला सांभाळते आहे. 

मी करिअर करतेय. मी अभिनय करतेय आता मी निर्मिती क्षेत्रातही सक्रीय आहे. मी व्यावसायिकादेखील आहे. मी खूप गोष्टी करते आहे आणि त्याच्यासाठी मला कोणत्याही पुरूषाच्या पावतीची गरज नाही, असे ती म्हणाली.

वर्कफ्रंटबद्दल...

अभिनेत्री तेजस्विनी पंडित शेवटची 'आदिपुरूष'मध्ये झळकली होती. यात तिने शूर्पणखाच्या भूमिकेत दिसली. 'अथांग' या वेबमालिकेची तिने निर्मिती केली होती. 'अग्गं बाई अरेच्चा', 'फॉरेनची पाटलीण', 'मी सिंधुताई सपकाळ', 'कॅंडल मार्च', 'एक तारा', 'तू ही रे', 'येरे येरे पैसा', 'नाथा पुरे आता' अशा चित्रपटांतून तसेच 'एकाच ह्या जन्मी जणू', 'तुझं नि माझं घर श्रीमंताचं' 'समांतर', 'रानबाजार' अशा मालिका, वेबसीरिजमध्ये ती पाहायला मिळाली.  

टॅग्स :तेजस्विनी पंडित