Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूर समोर ईशानने टेकले गुडघे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 07:00 IST

या एपिसोडचा मुख्य भाग आहे जेव्हा इशान खट्टर आणि दिनानाथजी 'तू जाने ना' हे गाणे म्हणत जान्हवी कपूर साठी गुडघ्यावर बसले होते

कलर्सचा लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने'ची चर्चा संपूर्ण शहरात होत आहे त्यातील स्पर्धकांनी सादर केलेल्या दिलखेचक आणि दिमाखदार कामगिरींमुळे हा वीकेंड प्रेक्षकांसाठी अजूनच रोमांचित करणारा असणार आहे. कारण इशान खट्टर, जान्हवी कपूर प्रसिध्द निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर सोबत विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.

या एपिसोडचा मुख्य भाग आहे जेव्हा इशान खट्टर आणि दिनानाथजी 'तू जाने ना' हे गाणे म्हणत जान्हवी कपूर साठी गुडघ्यावर बसले होते. दिनानाथजींच्या या गोष्टीमुळे चकित झालेली जान्हवी कपूर हसू थांबवू शकली नाही. या आनंदी क्षणाने शशांक खेतानची भरपूर प्रशंसा मिळवली, आणि त्यांना दिनानाथजी आणि त्यांच्या प्रवासाचा अभिमान वाटत आहे. धडकच्या निर्मात्याने पुढे सांगितले की एक फळविक्रेता त्याच्या डान्सच्या पॅशनने अनेकांना प्रेरणा देत आहे आणि हे सर्व प्रशंसा करण्याजोगेच आहे. 

या आगामी एपिसोडमध्ये फ्रेंडशिप साजरी केली जाणार आहे ज्यात प्रत्येकाला त्यांच्या सुंदर आठवणींना पुन्हा उजाळा द्यायचा  आहे.  प्रभादीपने सादर केलेल्या सॅटर्डे सॅटर्डे गाण्याने संपूर्ण देशातील लोकांना खिळवून ठेवले. त्याच्या कामगिरीने परीक्षक भारावून गेले आणि त्याचा परफर्मेन्स पाहुन त्याला हिरो ऑफ द स्टेजचा किबात दिला. ऐवढेच नाही तर फ्रेंडशिप वीक साजरा करताना, सर्व स्पर्धकांनी त्याला आश्चर्यचकित करत, त्याला प्रत्येकाचा फोटो असणारा टीशर्ट भेट म्हणून दिला. प्रेमाचे बंध आणि एकमेकांविषयीचा आदर मंचावर दिसून येत होता. हे सर्व पाहून भारावलेल्या माधुरी दीक्षित म्हणाली, “या शोचा भाग असणे हे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धकांचे बंध एकमेकांशी मनापासून जोडले गेले आहेत.'

टॅग्स :धडक चित्रपटइशान खट्टर