भारताचा माजी क्रिकेटपटू जहीर खानने 2017 मध्ये अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत लग्न केले. आज दोघेही आपल्या संसारात आनंदी आहेत. पण सागरिका हिच्याआधी जहीर दुस-याच एका अभिनेत्रीच्या प्रेमात क्लिनबोल्ड झाला होता. होय, या अभिनेत्री नाव होते ईशा शरवानी. ईशा ही बॉलिवूड अभिनेत्री व डान्सर आहे. आज ईशाचा वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला ईशा व जहीरच्या अधु-या राहिल्या लव्हस्टोरीबद्दल सांगणार आहोत.
दोघांची पहिली भेट 2005 मध्ये झाली होती. टीम इंडिया आॅस्ट्रेलियाच्या दौ-यावरून परतणार होती. निरोप समारोहादरम्यान ईशाने एक धमाकेदार परफॉर्मन्स दिला होता. जहीरने या कार्यक्रमात पहिल्यांदा ईशाला पाहिले होते. पण हे पहिल्या नजरेतले प्रेम नक्कीच नव्हते. पण पुढे दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम.
जहीरची मॅच पाहायला ईशा मैदानावर दिसू लागली. यानंतर दोघांतही काहीतरी खिचडी शिजत असल्याचे मानले जाऊ लागले. 2011 मध्ये वर्ल्ड कप दरम्यान ईशा व जहीर लग्न करणार, अशाही बातम्या आल्यात. पण अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली.