Join us

ईशा केसकरने केला मेकओवर, फोटो पाहताच चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 07:00 IST

ईशाला जय मल्हार या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली.

ईशाला जय मल्हार या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली बानोची भूमिका चांगलीच गाजली होती. ईशा सोशल मीडियावर बराच सक्रीय असते.  या माध्यमातून तीआपल्या फॅन्सशी जोडला गेला आहे. त्यांच्याशी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधतो, स्वतःचे फोटो आणि  व्हिडीओ तो शेअर करत असतो. ईशाने अलीकडेच तिचे काही फोटो शेअर केलं आहेत. या फोटो पाहून ईशाने तिचा मेकअप ओव्हर केल्याचा दिसतोय. फोटोत ईशाने केस शॉर्ट केल्याचे पाहिला मिळतेय. शॉर्ट हेअरमध्ये ईशा आणखी छान दिसतेय. चाहत्यांनी देखील तिचा हेअर कट आवडलेला दिसतोय. 

ईशा केसकरमाझ्या नवऱ्याची बायको मालिकेत शनायाची भूमिका साकारत होती. मात्र काही दिवसानंतर तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाऊन काळात मालिकेचे शूटींग बंद होते. यानंतर तीन महिन्यानंतर मालिकेचे शूटींग सुरु झाले.

याच काळात इशाच्या दाढेचे ऑपरेशन झाले. दाढेचे ऑपरेशन झाल्यामुळे दिलेल्या शूटिंगच्या तारखांना हजर राहणे तिला शक्य होणार नव्हती. तिच्यामुहे मालिकेचे चित्रीकरण लांबवणेही शक्य नव्हते. अखेर तिला मालिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. इशाने व्हिडीओ याची माहिती दिली आहे. ईशा अभिनेता ऋषी सक्सेनासोबत रिलेशनशीपमध्ये आहे.दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.

टॅग्स :ईशा केसकर