Join us  

कोंकणा सेन शर्मा या अभिनेत्याला करतेय डेट?, एक्स पती रणवीर शौरीच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 9:35 AM

Konkana Sen Sharma : कोंकणा सेन शर्मा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. ती बॉलिवूडच्या एका अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा (Konkana Sen Sharma) अभिनेता अमोल पाराशर(Amol Parashar)ला डेट करत आहे का? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या, ज्याला आता अभिनेत्रीचा एक्स पती आणि अभिनेता रणवीर शौरी (Ranvir Shorey) याने अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे. कोंकणा सेन आणि अमोल पराशर यांच्यात काहीतरी सुरू असल्याचे रणवीर शौरीने एक ट्विट केले आहे. अभिनेत्री अमोल पराशरला गुपचूप डेट करत असल्याच्या चर्चांमुळे चाहते हैराण झाले आहेत.

अलीकडेच एका अकाउंटवरून X वर एक ट्विट करण्यात आले. राजकारणी आणि इतर सेलिब्रिटींची खिल्ली उडवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या अकाउंटवर लिहिले आहे की कोंकणा सेन शर्माने मोदी भक्त रणवीर शौरी सोडून धर्मनिरपेक्ष अमोल पाराशर यांना डेट करण्याचा सर्वोत्तम निर्णय घेतला.

रणवीर शौरीच्या या कमेंटमुळे उडाली खळबळ या ट्विटला रिट्विट करत रणवीर शौरीने लिहिले की, 'मी याच्याशी सहमत आहे.' आता अभिनेत्याच्या या कमेंटने खळबळ उडाली आहे. कोंकणा खरोखरच अभिनेता अमोल पराशरला डेट करत आहे, असे चाहत्यांना वाटू लागले आहे. या ट्विटमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. एका युजरने लिहिले की, 'कोंकणा अमोलला डेट करत आहे? हे कधी घडले?' दुसऱ्याने लिहिले, 'हे कोणाचे तरी वैयक्तिक आयुष्य आहे. ह्यात पडू नकोस मित्रा. 

कोंकणा आणि अमोलने या सिनेमात केलंय काम

कोंकणा सेन शर्मा अजूनही कलाविश्वात सक्रिय आहे आणि ती 'पेज ३' आणि 'वेक अप सिड' सारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. तर, अमोल पराशर हा प्रसिद्ध अभिनेता असून त्याने 'सरदार उधम' चित्रपटात शहीद भगतसिंग यांची भूमिका साकारली आहे. तो लाइमलाइटपासूनही दूर राहतो. अमोलने कोंकणा सेनसोबत 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' या चित्रपटात काम केले होते.

कोंकणा सेन आणि रणवीरचे लग्न आणि घटस्फोटकोंकणाबद्दल बोलायचे तर तिने २००७ मध्ये रणवीर शौरीला डेट करायला सुरुवात केली आणि २०१० मध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले. २०११ मध्ये ते एका मुलाचे पालकही झाले. पण २०२० मध्ये कोंकणा सेन आणि रणवीर शौरी यांचा घटस्फोट झाला. मात्र, दोघेही अजूनही चांगले मित्र आहेत आणि आपल्या मुलाला एकत्र वाढवत आहेत.

टॅग्स :कोंकणा सेन शर्मारणवीर शौरी