Join us

अरबाज खान पुन्हा होणार बाबा? दुसरी पत्नी शूरा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:59 IST

 लग्नानंतर दोन वर्षांनी शूरा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ईद पार्टीतील शूरा आणि अरबाजचा एक व्हिडिओ या चर्चांसाठी कारण ठरला आहे.

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान त्याच्या पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत असतो. अरबाजने २०२३ मध्ये मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी निकाह करत नव्याने आयुष्याला सुरुवात केली होती. आता  लग्नानंतर दोन वर्षांनी शूरा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ईद पार्टीतील शूरा आणि अरबाजचा एक व्हिडिओ या चर्चांसाठी कारण ठरला आहे.

ईदनिमित्त सलमान खानने मुंबईत पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला अरबाज खानने त्याची पत्नी शूरासोबत हजेरी लावली होती. याचा व्हिडिओ विरल भय्यानी या पापाराझी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अरबाज आणि शूरा एकत्र आल्याचं दिसत आहेत. मात्र त्यांनी पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या नाहीत. अरबाज त्याच्या पत्नीला आतमध्ये सोडून मग पापाराझींना पोझ देण्यासाठी पुन्हा बाहेर आल्याचं दिसत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

प्रेग्नंट असल्यामुळे शूराने फोटोसाठी पोझ दिल्याचं काहींनी म्हटलं आहे. या ईद पार्टीसाठी शूराने फ्लोरल ड्रेस परिधान केला होता. आणि त्याखाली तिने शूजही घातले होते. शूरा गरोदर असल्यानेच तिने शूज घातले असावेत असा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे. पण, अद्याप याबाबत अरबाज किंवा शूराने प्रतिक्रिया दिलेली नाही. 

अरबाजने १९९८ मध्ये मलायका अरोराशी लग्न केला होतं. लग्नानंतर १९ वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे. आता पुन्हा अरबाज बाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.  

टॅग्स :अरबाज खानसेलिब्रिटी