Join us
Daily Top 2Weekly Top 5

८ किमीची मॅरेथॉन आणि लग्नात बनियनवर एन्ट्री! अखेर नुपूरने सोडलं मौन, म्हणाला, "मी आयराला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 14:03 IST

...म्हणून लग्नात धावत आला नुपूर शिखरे; 'त्या' व्हायरल व्हिडिओवर आमिरच्या जावयाची पहिली प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. आयराने बॉयफ्रेंड नुपूरबरोबर आधी कोर्ट मॅरेज आणि नंतर ख्रिश्चन पद्धतीने विवाह करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ३ जानेवारीला आयरा आणि नुपूरने कोर्ट मॅरेज केलं होतं. यावेळी नुपूर बनियनवर ८ किमी मॅरेथॉन धावत वरात घेऊन लग्नासाठी पोहोचला होता. 

स्वत:च्याच लग्नात बनियनवर घामाघूम होऊन आलेल्या नुपूरला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. नुपूर लग्नात धावत बनियनवर का आला असेल? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता अखेर यावर नुपूरने मौन सोडलं आहे. नुकतंच आयरा आणि नुपूरच्या लग्नाचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये नुपूरने लग्नात जॉगिंग करत येण्याचं भावुक करणारं कारण सांगितलं आहे. नुपूर म्हणाला, "मी माझ्या घरापासून आयराच्या घरापर्यंत धावत जायचो. ज्या रस्त्यावरुन मी धावत लग्नाच्या स्थळापर्यंत पोहोचलो. त्या रस्त्याशी माझं खास कनेक्शन आहे." 

नुपूरने  लग्नात बनियन एन्ट्री घेतल्यानंतर त्यांना ट्रोल करणाऱ्यांना आयराने सुनावलं होतं. आयराने याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. तो घोड्यावर आला नाही. तो धावत लग्नाच्या मांडवात पोहोचला. आणि रस्त्यांवर मी याचे क्यूट पोस्टर्स लावले आहेत," असं आयराने म्हटलं होतं. 

आमिरचा जावई नुपूर एक फिटनेस ट्रेनर आहे. त्याने अनेक सेलिब्रिटींना फिटनेसचं ट्रेनिंग दिलं आहे. आमिर खानचाही तो फिटनेस ट्रेनर होता. तेव्हापासूनच आयरा आणि नुपूर यांच्यातील प्रेमसंबंध फुलले. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :इरा खानआमिर खानसेलिब्रिटी