Join us
Daily Top 2Weekly Top 5

Interesting Track 'तुला पाहते रे'मध्ये ! ईशाने झेंडेंचाच उधळून लावला डाव अन् जिंकलं विक्रांतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 13:36 IST

तुला पाहते रे सध्या इंटरेस्टिंग वळणावर आली आहे.

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तुला पाहते रे सध्या इंटरेस्टिंग वळणावर आली आहे. राजनंदिनीचा पुनर्जन्म ईशा असल्याचं घरातल्यांना पटल्यानंतर मालिकेत विविध घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. नुकताच प्रसारीत झालेल्या भागात ईशाने झेंडेंचा डाव उधळून लावला आहे.

तुला पाहते रे मालिकेच्या नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात विलास झेंडे विक्रांत सरंजामेला ईशाच राजनंदिनी असून तिनेसुद्धा मान्य केल्याचं सांगतो आहे. मात्र विक्रांत ही गोष्ट मान्यच करत नाही. विक्रांत हा माझाच डाव होता की ईशाला राजनंदिनी असल्याचे भासवून द्यायचे. पण, ती खरंच राजनंदिनी असल्याचे झेेंडे सांगत असतानाही विक्रांत त्याला वेड्यात काढतो. त्यामुळे झेंडे ईशा राजनंदिनी असल्याचे सिद्ध करायचे ठरवतात. त्यासाठी झेंडे सर्जेरावला किडनॅप करून त्याच्याकडून ईशाच राजनंदिनी असल्याचे वधवून त्यांचा व्हिडिओ काढतात.

हा व्हिडिओ विक्रांतला दाखवून ईशाचे सत्य समोर आणण्याचे झेंडे ठरवतो. तर विक्रांतचा फोन टॅप करून सर्जेरावांचा पत्ता शोधून त्यांना तिथून जयदीप बाहेर काढतो. पण ती व्हिडिओ क्लीप पेनड्राईव्हमधून घेऊन झेंडेचा माणून सरंजामेंच्या ऑफिसमध्ये यायला निघतो. ईशा व मायरा आता काय करायचं हा विचार करत असताना त्या सुरक्षा रक्षकांना कोणत्याही माणसाला चेकिंग केल्याशिवाय आत सोडायचे नाही सांगतात व बॅग किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर आमच्याकडे घेऊन येण्याचे आदेश देतात.

झेंडेंचा माणूस ऑफिसमध्ये आल्यावर त्याच्याकडील बॅग घेऊन सुरक्षारक्षक ईशा व मायरा कडे येतात. त्या सुरक्षारक्षकाला बाहेर उभे राहण्यास सांगून ते पेनड्राइव्ह शोधतात. तर तिथे झेंडेचा माणूस त्यांना फोन करून घडलेला प्रकार सांगतो. झेंडे सुरक्षारक्षकाला त्याला आत सोडण्यास सांगतो. इतक्यात सुरक्षारक्षक त्याची बॅग घेऊन येतो. त्यात पेनड्राईव्ह आहे का हे झेंडेचा माणूस चेक करतो. विक्रांत सरांच्या केबीनमध्ये ईशा व झेंडे असताना माणूस तिथे येतो आणि ते पेनड्राईव्हमधील क्लीप पाहण्यासाठी जातात तर एक गाणं वाजू लागतं. त्यावर विक्रांत झेंडेवर वैतागतात. ईशा झेंडेशी बोलायला जाते तर झेंडे तिच्या खेकसतात. त्यावर विक्रांत झेंडेवर रागावून त्याला केबीनच्या बाहेर काढतात. 

ईशा विक्रांतकडे झेंडे आजकाल नीट वागत नाही. तुम्हालाही माझा राग येतो का असे म्हणत. विक्रांतवर प्रेम व्यक्त करते. त्यावर विक्रमही खूश होतो आणि ईशाला प्रॉपर्टीच्या पेपरवर सही कधी करणार विचारतो. त्यावर ईशा आईसाहेबांनी कागदपत्र तयार करायला सांगितले असल्याचे सांगते. ईशा प्रॉपर्टीच्या कागदांवर सह्या करणार म्हटल्यावर विक्रांत खूश होतो.

टॅग्स :तुला पाहते रेझी मराठीगायत्री दातार