Join us

आलिया भटने 'कलंक'मधील रुपच्या भूमिकेसाठी या पाकिस्तानी अभिनेत्रीकडून घेतली प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 19:30 IST

बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट 'कलंक' चित्रपटात रूपच्या भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट 'कलंक' चित्रपटात रूपच्या भूमिकेत दिसणार आहे. 'कलंक' चित्रपटाच्या ट्रेलरमधील रुपची झलक व 'घर मोरे परदेसिया' गाण्यातील तिचा अंदाज पाहून आलियाचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या भूमिकेच्या तयारीसाठी आलिया भटने पाकिस्तानी अभिनेत्रीकडून प्रेरणा घेतली आहे.

आलिया भटने एका मुलाखतीत सांगितले की, 'दिग्दर्शक अभिषेक वर्मन यांनी रुपची भूमिका साकारण्याआधी काही हिंदी चित्रपट पाहायला सांगितले होते. मी 'मुघल-ए-आझम', 'उमराव जान' पाहिले. हे चित्रपट पाहून मी बॉडी लँग्वेज आणि भूमिकेत लहेजा आणण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटासाठी आलिया भटने फवाद खानची 'जिंदगी गुलजार है' ही मालिकादेखील पाहिली.'

आलियाने पुढे सांगितले की,' दिग्दर्शक अभिषेक वर्मनने मला फवाद खानची मालिका 'जिंदगी गुलजार है' पाहण्याचा सल्ला दिला. याचे कारण होते कशफची भूमिका. 'जिंदगी गुलजार है' मालिकेत कशफ मुख्य भूमिकेत आहे. कशफची भूमिका कलंकमधील रुपसारखी भूमिका आहे. मालिकेत कशफ जास्त खूश राहत नाही कारण तिच्यावर घराची संपूर्ण जबाबदारी असते. मात्र ती खूप स्ट्राँग आहे. अशीच भूमिका रुपची आहे.'

आलियाने एका मुलाखतीत सांगितले की, 'जेव्हा पहिल्यांदा मी कलंक चित्रपटाची कथा करण जोहर कडून ऐकली तेव्हा मी स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटाची चित्रीकरण करत होती. मात्र जेव्हा मी अभिषेक वर्मन यांच्याकडून कथा ऐकली तेव्हा कथेत बदल झाला होता. सर्वात चांगली गोष्ट ही होती की अभिषेक वर्मन यांनी माझ्या भूमिकेला लक्षात ठेवून कथा लिहिली होती.'

'कलंक' चित्रपटात आलिया भट शिवाय वरूण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त व सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :कलंकआलिया भटवरूण धवन