Join us
Daily Top 2Weekly Top 5

पारंपारिक पद्धतीने पार पडणार इंद्रायणी आणि अधोक्षजचा लग्नसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:42 IST

Indrayani Serial : अधू आणि इंदूचे मोठ्या धुमधडाक्यात लग्न होणार आहे.

लग्न म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात... जन्मभराचे ऋणानुबंध. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. आणि हाच क्षण आता आपल्या अधू आणि इंदूच्या आयुष्यात आला आहे. मोठ्या धुमधडाक्यात या दोघांचे लग्न होणार आहे. ज्या क्षणाची वाट अधूसोबत अख्खा महाराष्ट्र बघत होता तो क्षण आता जवळ आला आहे. 

एकीकडे इंदू आणि अधू यांच्या नव्या नात्याची सुरुवात होणार आहे. पण, गोपाळ हे पचवू शकेल का ? गोपाळ आणि इंदूच्या नात्यात अनेक अनपेक्षित वळणं आली, कधी गैरसमज तर कधी प्रेम तर कधी भांडणाची वादळं, कधी दुरावा. शेवटी गोपाळने इंदूला शेवटचा पर्याय दिला की लग्न झाल्यावर मुंबईमध्ये स्थायिक होऊया पण इंदूला ते मान्य नव्हते. विठूची वाडी, तिची माणसं आणि तिचे शाळेचं स्वप्नं सोडून तिला जाणे मान्य नव्हते. हे घडत असतानाच व्यंकू महाराजांना कळणं अधूचे इंदूवर जीवापाड प्रेम आहे आणि त्यांनी इंदूला अधूशी लग्नासाठी विचारणा करणं. आणि हे होताच इंदूची झालेली द्विधा मनःस्थिती अखेर विठू पंढरपूरकरने सोडवली. इंदूने अधूसोबत लग्नासाठी होकार दिला असून ती आता तिच्या निर्णयावर ठाम आहे. आता अखेर तो शुभ दिवस आला आहे. मंडप सजला आहे, तोरण लागली आहेत. मुहूर्त देखील निघाला आहे, स्थळ देखील निश्चित झाले आहे. 

अधू - इंदू यांचा विवासोहळा पार पडणार आहे. लग्नासाठी इंदूचा खास मराठमोळा लूक असणार आहे नऊवारी साडी, नथ, शेला, हिरवा चुडा या लुकमध्ये इंदू खूप सुंदर दिसत आहे. दोघांचाही अस्सल मराठमोळा बाज दिसून येणार आहे. लग्न पारंपरिक पध्दतीने पार पडणार आहे. होम, सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख सगळ्या विधी पार पडणार आहेत. खऱ्या अर्थाने अधूला इंदूची साता जन्मासाठी साथ मिळाली आहे.

इंदू आणि अधूच्या नात्याला आनंदी मनापासून स्वीकारेल का?

असं म्हणतात सात जन्माच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. आयुष्याच्या जोडीदाराची कुठल्यातरी टप्यावर भेट लिहूनच ठेवलेली असते. पण नियतीच्या खेळीत अडकलेले दोन जीव अधू - इंदू एकत्र कसे येणार  ? इंदू आणि अधूच्या नात्याला आनंदी मनापासून स्वीकारेल का? या परिस्थितीत अधूची खंबीर साथ इंदूला मिळणार ? पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी इंद्रायणी मालिकेचा शुभमंगल सोहळा ८ जून दीड तासाचा विशेष भाग दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर पाहा. 

टॅग्स :कलर्स मराठी