Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेखासोबत ‘कामसूत्र’मध्ये झळकलेल्या या अभिनेत्रीलाही झाली कोरोनाची बाधा, स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 10:33 IST

टॉम हँक्स, इडरिस एल्बा यांच्यानंतर ‘कामसूत्र’ या सिनेमातील एका अभिनेत्रीलाही कोरोनाची लागण झाली आहे.

ठळक मुद्दे2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ऐश्वर्या रायच्या ‘ब्राईड अ‍ॅण्ड प्रिज्युडिस’ या हॉलिवूड सिनेमातही इंदिरा वर्माने काम केले होते.

कोरोना व्हायरसमुळे अख्ख्या जगात भीती आणि दहशतीचे वातावरण असताना, अनेक सेलिब्रिटींनी या व्हायरससंदर्भात जनजागृती करताना दिसत आहेत. अशात काही स्टार्स स्वत: या व्हायरसशी लढत आहेत. टॉम हँक्स, इडरिस एल्बा यांच्यानंतर  ‘कामसूत्र’ या सिनेमातील एका अभिनेत्रीलाही कोरोनाची लागण झाली आहे. होय, ब्रिटीश अभिनेत्री इंदिरा वर्मा हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.

इंदिराने हॉलिवूडच्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या सिनेमातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.याच  46 वर्षीय इंदिराला कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. बुधवारी इंदिराने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली.

 इंदिरा वर्माचे वडील भारतीय आहे तर आई स्वित्झर्लंडची आहे. 1996 मध्ये ‘कामसूत्र- द टेल ऑफ लव्ह’ या सिनेमामुळे इंदिरा चर्चेत आली होती.  ब्रिटीश, जर्मन व जपानी स्टुडिओने एकत्र येऊन ‘कामसूत्र- द टेल ऑफ लव्ह’ हा सिनेमा प्रोड्यूस केला होता. मीरा नायरने तो दिग्दर्शित केला होता. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री रेखा हिने कामसूत्र शिक्षिकेची भूमिका साकारली होती. मात्र  बोल्ड दृश्यांमुळे हा सिनेमा प्रचंड वादात सापडला होता. इतका की, सेन्सॉर बोर्डाने या सिनेमावर बंदी लादली होती. त्यामुळे भारतात हा सिनेमा प्रसिद्ध झाला नव्हता.  यात इंदिरा वर्मा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत होती.

 

2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ऐश्वर्या रायच्या ‘ब्राईड अ‍ॅण्ड प्रिज्युडिस’ या हॉलिवूड सिनेमातही इंदिरा वर्माने काम केले होते. ‘गेम ऑफ थ्रोन्स’, ‘रोम’ या सीरिजमध्येही तिने काम केले आहे.

टॅग्स :रेखाकोरोना वायरस बातम्या