Join us

Indian Idol 12 Grand Finale : कोण आहे पवनदीप राजन? 2015 मध्ये जिंकलाय एक शो   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 00:12 IST

Indian Idol 12 Grand Finale : केवळ दोन वर्षाचा असताना पवनदीपने एक विक्रम रचला होता. पवनदीप उत्तम गातो शिवाय अनेक म्युझिकल इंस्ट्रूमेंटही वाजवू शकतो.

ठळक मुद्दे‘इंडियन आयडल 12’च्या एका एपिसोडमध्ये बप्पी लहरी यांनी पवनदीपला सोन्याची साखळी भेट दिली होती. हिमेश रेशमियाने त्याला  एक नाही तर 10 गाण्यांची ऑफर दिली आहे.

इंडियन आयडल 12  चा (Indian Idol 12) विजेता पवनदीप राजन (Pawandeep Rajan) मूळचा उत्तराखंडच्या कुमाऊंचा राहणारा आहे. संगीताचा वारसा त्याला घरातच मिळाला. पवनदीपचे वडील आणि काका यांनी त्याला बालपणापासून संगीताची शिक्षा दिली. त्याचे आजोबा त्या काळातील प्रसिद्ध लोककलावंत होते. पवनदीपने याआधीही एक सिंगींग रिअ‍ॅलिटी शो जिंकला आहे. 2015 साली ‘व्हॉईस इंडिया’च्या पहिल्या सीझनचा तो विजेता होता.पवनदीप उत्तम गातो  शिवाय अनेक म्युझिकल इंस्ट्रूमेंटही वाजवू शकतो. (Indian Idol 12 Grand Finale ) 

केवळ दोन वर्षाचा असताना पवनदीपने एक विक्रम रचला होता,. होय, लहानपणापासून पवनदीप तबला वाजवतो. दोन-अडीच वर्षाचा असताना त्याला सर्वाधिक कमी वयाचा तबलावादक म्हणून गौरविण्यात आले होते, तबल्याशिवाय पियानो, ढोलकी, की-बोर्ड, गिटार इत्यादी वाद्य  तो वाजवतो. पवनदीप एक म्युझिक डायरेक्टरही आहे. 

अनेक मराठी सिनेमांना शिवाय पहाडी चित्रपटांना त्याने संगीत दिले आहे. देशविदेशात त्याने अनेक लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केला आहे.  एका वेबसाईटनुसार, पवनदीपने आत्तापर्यंत 13 देशांत आणि भारताच्या 14 राज्यांत सुमारे 1200 शो केले आहेत. इतक्या कमी वयात इतकी मोठी कामगिरी केल्याने उत्तराखंड सरकारने पवनदीपला ‘युथ अ‍ॅम्बिसीडर ऑफ उत्तराखंड’ या किताबाने गौरविले होते.‘इंडियन आयडल 12’च्या एका एपिसोडमध्ये बप्पी लहरी यांनी पवनदीपला सोन्याची साखळी भेट दिली होती. हिमेश रेशमियाने त्याला  एक नाही तर 10 गाण्यांची ऑफर दिली आहे.

टॅग्स :इंडियन आयडॉल