दहा महिन्यानंतर इंडियन आयडल 12 हा सिंगींग रिअॅलिटी शो अगदी अखेरच्या टप्प्यात आहे. आज दुपारी 12 वाजतापासून या शोचा 12 तासांचा ग्रेट ग्रँड फिनाले (Indian Idol 12 Finale) सुरू झाला. रात्री 12 च्या ठोक्याला विजेत्याच्या नावाच्या घोषणेसह हा शो संपणार आहे. दुपारी 12 वाजतापासून सुरू झालेल्या या ग्रेट ग्रँड फिनालेमध्ये स्पर्धकांचे एकापेक्षा एक धमाकेदार परफॉर्मन्स झालेत. शिवाय अल्का याग्निक, मिका सिंग, जावेद अली अशा दिग्गजांनीही दमदार परफॉर्मन्स दिले. काही माजी स्पर्धकांनीही फिनालेमध्ये रंग भरले. अन्नू कपूर यांच्यासोबतची अंताक्षरीही गाजली. 12 तासांचा हा ग्रँड फिनाले धमाकेदार व्हावा, यासाठी मेकर्सनी कोणतीही कसर सोडली नाही. पण नेटक-यांनी मात्र तरीही शोची मजा घेतलीच...12 तासांच्या ग्रँड फिनालेवर नेटक-यांनी एकापेक्षा एक भारी प्रतिक्रिया दिल्या आहेत़.पाहा काही मजेशीर प्रतिक्रिया...
इतना जुल्म...! Indian Idol 12च्या ग्रँड फिनालेवर नेटकर्यांच्या एकापेक्षा एक भारी कमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 19:20 IST
Indian Idol 12 Finale: आज दुपारी 12 वाजतापासून या शोचा 12 तासांचा ग्रेट ग्रँड फिनाले सुरू झाला. रात्री 12 च्या ठोक्याला विजेत्याच्या नावाच्या घोषणेसह हा शो संपणार आहे.
इतना जुल्म...! Indian Idol 12च्या ग्रँड फिनालेवर नेटकर्यांच्या एकापेक्षा एक भारी कमेंट्स
ठळक मुद्दे दुपारी 12 वाजतापासून सुरू झालेल्या या ग्रेट ग्रँड फिनालेमध्ये स्पर्धकांचे एकापेक्षा एक धमाकेदार परफॉर्मन्स झालेत.