'इंडियन आयडल' शोमधला धमाकेदार परफॉर्मन्स देणारा मराठमोळा स्पर्धक नचिकेत लेले याच शोमुळे प्रकाशझोतात आला होता. या शोमधून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सर्वात टॅलेंटेड स्पर्धक म्हणून त्याची ओळख निर्माण झाली असली तरी शोमधून तो एलिमिनेट झाला तेव्हा रसिकांनाही मोठा धक्काच बसला होता.
नचिकेत लेलेला शोमधून एलिमिनेट केल्यामुळे रसिकांनीही नाराजी व्यक्त केली होती. नचिकेत शोमधून बाहेर पडला असला तरी सोशल मीडियावर गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. सोशल मीडियावर नजर टाकल्यास नचिकेत अनेक व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळती. यापैकीच नचिकेतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये तो ‘लाईफ इन ए मेट्रो’ सिनेमातील‘ओह मेरी जान’ हे गाणं गात आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतं आहे.
मूळचा कल्याणचा असणाऱ्या नचिकेत लेलेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतातच नाही तर सातासमुद्रापारही त्याची लोकप्रियता पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘इंटरनेशनल क्रश’ असेही नचिकेतला म्हटलं जात आहे. इंडियन आयडल शोमधून बाहेर पडला असला तरीही नचिकेतची जादू कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते हेच नचिकेत लेलेने सिद्ध करून दाखवलंय.
( Also Read: ...तर कानाखाली आवाज काढेन, आदित्यचा उद्धटपणा वाढलाय; अमेय खोपकरांनी दिला इशारा)
नचिकतचे गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत. इंडियन आयडलच्या मंचावर ज्या प्रकारे नचिकेतनं 'एक चतुर नार' हे गाणं गायलं होतं त्याच्यासारखं गाणं कोणीच गाऊ शकणार नाही अशीही आठवण चाहते त्याच्यासह शेअर करत आहेत. त्याचे प्रचंड कौतुक करत आहे. शोमधल्या जजेसची पसंती मिळवण्यात नचिकेत अपयशी ठरला असला तरीही आपल्या गायकीने त्याने आज जगभरातल्या रसिकांची पसंती मिळवली आहे.