Join us

Arunita Kanjilal चं नवं गाणं रिलीज होताच झालं व्हायरल, सोशल मीडियावर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 16:34 IST

Arunita Kanjilal New Song : अरूणिताने गायलेल्या या गाण्याचे बोल आहेत 'लाल हरी पीलि चूडियां'. गाणं संगीतकार-गायक हिमेश रेशमियाने कंपोज केलं तर गाण्याचे बोलही त्यानेच लिहिले आहेत.

इंडियन आयडल १२ ची पहिली रनर अफ अरूणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) शो संपल्यापासूनच चांगलीच चर्चेत आहे. पवनदीपसोबतच्या नात्यामुळे ती सतत चर्चेत असते. नुकतेच त्यांचे लंडनमधील फोटो व्हायरल झाले होते. आता अरूणिताचं नवं गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिने तिच्या गोड आवाजात सुंदर असं गाणं गायलं आहे. 

अरूणिताने गायलेल्या या गाण्याचे बोल आहेत 'लाल हरी पीलि चूडियां'. गाणं संगीतकार-गायक हिमेश रेशमियाने कंपोज केलं तर गाण्याचे बोलही त्यानेच लिहिले आहेत. हे गाणं आता रिलीज करण्यात आलं असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. रिलीज झाल्यावर केवळ एका दिवसात  या गाण्याला ३० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक अरूणिताचं भरभरून कौतुक करत आहेत. 

अरूणिता ही इंडियन आयडल जिंकली नसली तरी ती ट्रॉफीची मुख्य दावेदार मानली जात होती. तिच जिंकणार असं अनेकांना वाटत होतं. पण तसं झालं नाही. तिचा मित्र पवनदीप या शोचा विजेता ठरला. दोघांचं रिलेशनशिपही यावेळी चर्चेचा विषय ठरलं. आताही दोघांची चर्चा सोशल मीडियावर होत असते. 

टॅग्स :इंडियन आयडॉलसेलिब्रिटीहिमेश रेशमिया