Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हा फक्त पुरस्कार नाही तर...", पद्मश्री जाहीर झाल्यानंतर अभिनेता आर माधवनने लिहिली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 15:51 IST

आर माधवन पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाला?

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल भारत सरकारने सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कांरांची घोषणा केली. यावर्षी ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री अशा एकूण १३१ नागरिकांना त्यांच्या कला, समाजसेवा, विज्ञान आणि विविध क्षेत्रांतील अतुलनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांचा यामध्ये समावेश आहे. अभिनेता आर माधवनला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. नुकतंच माधवनने सोशल मीडियावर पोस्ट करत आभार व्यक्त केले आहेत.

आर माधवनने इन्स्टाग्रामवर लिहिले, "तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार! मी अत्यंत कृतज्ञता आणि नम्रतापूर्वक मी हा पुरस्कार माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने स्वीकारत आहे, ज्यांचा खंबीर पाठिंबा आणि विश्वास हीच माझी सर्वात मोठी शक्ती राहिली आहे.

हा गौरव केवळ माझे मार्गदर्शक आणि हितचिंतकांचे आशीर्वाद, जनतेचे प्रेम व प्रोत्साहन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईश्वराच्या कृपेमुळेच शक्य झाला आहे. माझ्या या प्रवासाला आकार देण्यात आणि मला या क्षणापर्यंत पोहोचवण्यात या प्रत्येकाची अमूल्य भूमिका आहे. मी याकडे केवळ एक पुरस्कार म्हणून पाहत नाही, तर ही एक जबाबदारी आहे असे मानतो. हा सन्मान ज्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करतो, ती मूल्ये मी सन्मानाने, प्रामाणिकपणे आणि पूर्ण निष्ठेने जपण्याचे वचन देतो. या विलक्षण पाठिंब्याबद्दल आणि कौतुकाबद्दल माझे हृदय कृतज्ञतेने भरून आले आहे. येणाऱ्या काळातही मी सचोटी, नम्रता आणि समर्पणाने आपली सेवा करत राहीन अशी आशा व्यक्त करतो. (तुमचं प्रेम आणि तुम्ही पाठवलेले मेसेज पाहून मी भारावून गेलो आहे. कृपया मला तुम्हा सर्वांना वैयक्तिकरित्या उत्तर देण्यासाठी थोडा वेळ द्या.)" 

आर माधवन नुकताच 'धुरंधर' सिनेमात दिसला. यामध्ये त्याने आयबी चीफची भूमिका साकारली. माधवन गेल्या दोन दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्याच्या 'रहना है तेरे दिल मे' सिनेमाने तरुणाईवर राज्य केलं आणि आजही हा सिनेमा तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. या सिनेमामुळे त्याला मॅडी ही ओळख मिळाली. माधवनने हिंदी आणि साउथमध्येही डंका गाजवला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या 'रॉकेट्री' सिनेमाचंही खूप कौतुक झालं. आता तो 'धुरंधर २'मध्ये दिसणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : R Madhavan humbled by Padma Shri, sees it as responsibility.

Web Summary : Actor R Madhavan expresses gratitude for the Padma Shri award, dedicating it to his family. He views it as a responsibility to uphold its values with integrity and humility. He thanks fans for their support. Madhavan will appear in 'Dhurandar 2'.
टॅग्स :आर.माधवनपद्मश्री पुरस्कारबॉलिवूड