Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ind Vs. Eng : सैफ-तैमूर क्रिकेट लढतीला उपस्थित, धोनीसह पाहिला सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 09:28 IST

मंगळवारी झालेल्या भारत- इंग्लंड एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने आपला मुलगा तैमूरसह हजेरी लावली.

लंडन:  केनिंग्टन ओव्हल येथे मंगळवारी झालेल्या भारत- इंग्लंड एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने आपला मुलगा तैमूरसह हजेरी लावली. विशेष म्हणजे तैमूरने आपला पहिला क्रिकेट सामना महेंद्रसिंह धोनी आणि गॉर्डन ग्रीनिज या दिग्गजांसोबत बघितला.

सैफ अली खान आणि क्रिकेटचे फार जवळचे नाते आहे. त्याचे आजोबा इफ्तिकार अली खान पतौडी आणि वडील मन्सूर अली खान पतौडी (टायगर पतौडी) भारतीय क्रिकेट इतिहासातील दिग्गज आहेत. मन्सूर अली खान पतौडी हे भारताचे कर्णधारही होते. सैफ अली खानने क्रिकेटमध्ये न जाता अभिनय क्षेत्राची निवड केली.

असे असले तरी तो क्रिकेटचा चाहता आहे. क्रिकेटमधील अनेक खेळाडूंसोबत त्याची चांगली मैत्री आहे. याची झलक ओव्हलच्या मैदानावर दिसली.  सैफने  धोनी आणि   गॉर्डन ग्रीनिज यांची भेट घेतली. या वेळी  पत्नी करिना कपूर खान आणि मुलगा तैमूर हेही सोबत होते. करिनाने आपल्या इन्स्टाग्रामवरही काही फोटो शेअर केले.

टॅग्स :सैफ अली खान तैमुरभारतीय क्रिकेट संघ