Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ, शर्लिन चोप्राने गंभीर आरोप करत केली तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 13:21 IST

शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. पोर्नोग्राफी कंटेट प्रकरणी राज कुंद्रा याला अटक करण्यात आली होती. तो दोन महिन्यापासून तुरूंगात होता. अखेर ६२ दिवसानंतर राज कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला. तेव्हापासून शर्लिन चोप्रा सातत्याने चर्चेत येत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचे नाव समोर आल्यानंतर शर्लिनने सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आणि राजवर या रॅकेटमध्ये सामील असल्याचा आरोप केला. आता शर्लिनने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात फसवणूक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे.

शर्लिनने १४ ऑक्टोबर रोजी ही तक्रार दाखल केली. तिने मीडियाला सांगितले की, 'मी राज कुंद्राविरोधात लैंगिक छळ, फसवणूक व धमक्या दिल्याची तक्रार केली आहे.'

ती पुढे म्हणाली की, 'त्याने अंडरवर्ल्डची धमकी दिली. नीट लक्षात असू द्या,की तुम्ही माझ्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. मुलींना त्यांचे शरीर दाखवायला बळजबरी केली, तुम्ही त्यांचे पैसे का देत नाही? तुम्ही त्यांची फसवणूक का करता? ते कलाकाराच्या घरी जातात आणि त्याला अंडरवर्ल्डची धमकी देतात. ते म्हणतात लैंगिक अत्याचाराचे प्रकरण मागे घ्या अन्यथा तुमचे आयुष्य उध्वस्त होईल. त्यांनी मला धमकावले आणि अनेक धमक्या दिल्या. मी एकटी महिला आहे. मला एकटे राहण्याची भीती वाटते. आज मी हिमतीने पुन्हा समोर आले.शर्लिन चोप्राने सांगितले की, २७ मार्च, २०१९ रोजी राज कुंद्रा रात्री उशिरा तिच्या घरी आले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. राज कुंद्राच्या दबावाखाली तिने २९ मार्चला फोटोशूट केले. 

टॅग्स :राज कुंद्राशिल्पा शेट्टीशर्लिन चोप्रा