Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रात्रीस खेळ चाले'मध्ये पूर्वाचं लग्न निर्विघ्न पार पडणार की त्यात अण्णा आणि शेवंता विघ्न आणणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 17:22 IST

रात्रीस खेळ चाले ३ (ratris khel chale 3) या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या मालिकेला पहिल्या पर्वापासून प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.

रात्रीस खेळ चाले ३ (ratris khel chale 3) या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या मालिकेला पहिल्या पर्वापासून प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे आणि म्हणूनच या मालिकेचं प्रेक्षकांच्या भेटीस आलेलं ३ पर्व देखील लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील माई, अण्णा नाईक, शेवंता या प्रमुख पात्रांसह इतर सह पात्रांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.. या मालिकेतील प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं कि पूर्वाचं लग्न पुन्हा लावून देण्यासाठी अभिराम प्रयत्न करतोय. त्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश देखील आलं आहे.

पूर्वाच्या सासरकडून लग्नाचा होकार येतो. त्यामुळे वाड्यात सगळे लग्नाच्या तयारीला लागतात पण वच्छीला त्याचवेळी हसणारे अण्णा दिसतात. तिला लग्नकार्यात काहीतरी अशुभ घडेल, याची कुणकुण लागते. अभिराम ठामपणे घरच्यांना सांगतो काळजी करू नका काहीही झालं तरी लग्न नीट पार पाडण्याची जबाबदारी मी आणि कावेरी घेतो. पण सयाजी आणि कावेरी अण्णा – शेवंताच्या तावडीतून सुटण्यापेक्षा अधिकच त्यांच्या कात्रीत अडकत असताना हे लग्न निर्विघ्न पार पडेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

टॅग्स :रात्रीस खेळ चाले ३टिव्ही कलाकार