Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला शिकवीन चांगलाच धडा' रंजक वळणावर, अक्षराकडून अधिपतीला रोमँटिक गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 10:12 IST

Tula Shikvin Changlach Dhada : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिका रंजक वळणावर आली आहे. या मालिकेतील अक्षरा आणि अधिपतीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.

झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changlach Dhada) मालिका रंजक वळणावर आली आहे. या मालिकेतील अक्षरा आणि अधिपतीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. दरम्यान आता ही मालिका रंजक वळणावर आली आहे. अधिपतीचा वाढदिवस साजरा होतोय. अक्षरा अत्यंत प्रेमाने त्याला शर्ट गीफ्ट देते, त्याला औक्षण करते. 

दुसरीकडे भुवनेश्वरीने अधिपतीला ओवाळायचं म्हणून सगळी तयारी केली आहे. तिने सुद्धा अधिपतीसाठी गिफ्ट आणले आहे. अधिपती भुवनेश्वरीचा आशीर्वाद घ्यायला येतो तेव्हा भुवनेश्वरी त्याला पाहून चिडते. आपल्या आधी अक्षराने त्याला ओवाळले आणि अधिपतीने अक्षराने दिलेला शर्ट घातलेला हे बघून तिने आणणलेल्या गिफ्टला आग लावते.  भुवनेश्वरी रडायचे नाटक करते. हे पाहून अखेर अधिपती अक्षराने दिलेला शर्ट काढतो. 

चारुहास अक्षराला येऊन सांगतो की भुवनेश्वरी तुमचा संसार कधीच सुखाने होऊ देणार नाही. त्यामुळे तुम्ही दोघे ४-५ दिवस कुठेतरी बाहेर जाऊन या आणि त्याचवेळेस तुझ्या मनातील प्रेम त्याच्याकडे व्यक्त कर. वाढदिवसाच्या निमिताने अधिपती शाळेत वृक्षारोपण करत असताना त्याच्या पायावर कुदळ लागते आणि अधिपतीला दुखापत होते. घरी वाढदिवसाची जंगी तयारी करणारी भुवनेश्वरी संतापते.  घराबाहेर पडायचं नाही हे सांगितलेले असताना सुद्धा अक्षरा अधिपतीला बाहेर घेऊन जाते याचा भुवनेश्वरीला राग येतो. अधिपतीच्या दुखापतीचे खापर ती अक्षरावर फोडते. अक्षराकडून अधिपतीला वाढदिवसाचे एक खास गिफ्ट मिळणार आहे. आता काय आहे हे खास गिफ्ट? अधिपती अक्षरा एकमेकांजवळ येऊ शकतील ? हे जाणून घेण्यासाठी 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका पाहावी लागेल.

टॅग्स :झी मराठी