Join us

Illeana D'Cruz : इलियान डिक्रूझने फ्लॉन्ट केलं बेबी बम्प, चेहऱ्यावर आलाय प्रेग्नेंसी ग्लो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 13:39 IST

इलियानाने ८ एप्रिल २०२३मध्ये प्रेग्नंसीची घोषणा केल्यापासून ती सतत चर्चेत असते.

एप्रिल महिन्यात इलियान डिक्रूझने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केल्यापासून ती चर्चेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने आपले बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचा फोटो शेअर केले आहेत. ब्लॅक ड्रेसमध्ये इलियानाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीची ग्लो आलायं. वेगवेगळे अँगलने ती बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसतेय. 

इलियानाने काही फोटो शेअर केले आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीने वेगवेगळ्या अँगलने फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा ग्लो आलले स्पष्ट दिसतोय. यादरम्यान तिने ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप आणि मॅचिंग पँट घातलेली दिसतेय. हे फोटो शेअर करताना तिने, 'अँगल्स.'

  सध्या इलियाना कॅटरिना कैफचा (Katrina Kaif) भाऊ सबास्टियन ला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. त्यांचे एकत्रित व्हॅकेशनचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेत होते. याआधी इलियानाचा अंड्र्यू नीबोनसह ब्रेकअप झाला आहे. दोघेही अनेक वर्ष एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यांचं नातं संपुष्टात आलं. आता इलियाना आणि कॅटरिनाच्या भावाची चर्चा आहे.

 इलियानाने ८  एप्रिल २०२३मध्ये प्रेग्नंसी सोशल मीडिया पोस्ट करत जाहिर केली होती. यादरम्यान 'बर्फी' फेम अभिनेत्री सोशल मीडियावर दोन क्युट फोटो शेअर केले होते. पहिला फोटो टीशर्टचा आहे ज्यावर 'अँड सो द अँडव्हेंचर बिगिन्स' असं लिहिलेलं होतं. तर दुसरा फोटो तिच्या गळ्यातील पेंडंटचा आहे. 'mama' (ममा) अशा आशयाचं हे पेंडंट आहे. इलियानाची पोस्ट बघून सगळ्यांना धक्काच बसला आहे. 

टॅग्स :इलियाना डीक्रूजप्रेग्नंसी