रुस्तम', 'रेड' अन् 'बर्फी' आणि 'बादशाहो'' यासारख्या सिनेमात काम केलेली ही अभिनेत्री सध्या सिनेमातून गायब आहे. आम्ही बोलतोय अभिनेत्री इलियाना डिक्रूजबाबत. इलियाना प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असते. गेल्या अनेक महिन्यांपासून इलियाना ऑस्ट्रेलियातील फोटोग्राफर अँड्रयूशी नीबॉनला डेट करत होती.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}}
काही दिवसांपूर्वीने तिने गुपचूप लग्न केल्याची चर्चा होता. ऐवढेच नाही तर इलियाना प्रेग्नेंट असल्याचीदेखील चर्चा रंगली होती. मात्र इंडिया टिव्हीच्या रिपोर्टनुसार इलियाना आणि अँड्रयूचे ब्रेकअप झाले आहे.
इलियाना सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि बॉयफ्रेंडसोबतचे फोटो ती शेअर करत असते. मात्र रिपोर्टनुसार गेल्या काही दिवसांपासून दोघांनी एकमेकांशी बोलणं बंद केले आहे. लवकरच ही जोडी वेगळी होणार असल्याची माहिती आहे. इलियाने इन्स्टाग्रामवरुन अँड्रयूचे सगळे फोटो डिलीट केले आहेत. रिपोर्टनुसार दोघांमध्ये खूप भांडणं झाली आहेत.
इलियाना लवकरच अनीस बाज्मीच्या 'पागलपंती' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात इलियाना व्यतिरिक्त जॉन अब्राहम, अनिल कपूर, उर्वशी रौतेला आणि अरशद वारसी यांच्या भूमिका आहेत. सध्या सिनेमाचे काही भागाचे शूटिंग हे लंडनमध्ये सुरू आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचे प्लॅनिंग आहेत. इलियाना मध्यंतरी तिच्या अफेअरमुळेही चर्चेत होती. ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँड्रयू निबोनसह असलेल्या अफेअरमुळे तिने खूप पब्लिसिटीही मिळवली.